मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणजेच ठाण्याची शिवसेना, असं साधारण चित्र आहे. ठाण्याचे शिवसेना (Maharashtra Political Crisis) पक्षप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं, असं म्हटलं तर नवल वाटू नये. आनंद दिघे (Aanand Dighe) यांचे कट्टर समर्थक आणि कडवे शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांची कारकिर्दही संघर्षाची राहिलीये. जेव्हा ठाणे पालिकेवर एकहाती शिवसेना सत्ता मिळवू शकली नव्हती, तिथे त्यांनी शिवसेनेचा भगवा दिमाखात फडकवून दाखवला होता. केडीएमसी आणि इतर आजूबाजूच्या पालिकांमध्येही सेनेला सत्ता मिळवून देण्यात शिंदेचा मोलाचा वाटा होता. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात शिवसेनेचा विस्तार एकनाथ शिंदेनी करण्यात सुरुवात केली. त्यात त्यांना यशही आलं. यानंतर गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार उदयाला आलं. वेळोवेळो तिन्ही पक्षांनी राजकीय संकटांचा अनुभव घेतला. त्यानंतर आता शिवसेनेवर आलेल्या संकटानं सरकारच्या भविष्यावरच सवाल उपस्थित केले. या सगळ्यात आनंद दिघे कार्ड एकनाथ शिंदे हे चतुराईनं वापरताना दिसत असल्याचं ठाण्यातील शिंदे समर्थक सांगतात.
शिवसेनेत ज्यांनी ज्यांनी बंड केलं होतं, त्या सगळ्यांना बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरे, नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरेंनी लक्ष्य केलं होतं. आपला फोटो किंवा नाव वापरण्यास मज्जाव केलेला होता. ही बाब एकनाथ शिंदे यांना ठाऊक नाही, असं होणारच नाही. त्यांनी ही बाब ध्यानात घेऊनच ठाण्याचे शिवसेनाप्रमुख आनंद दिघे कार्ड खेळण्याचं ठरवलंय, असं दिसून येतंय.
एकनाथ शिंदेच्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये बाळासाहेबा ठाकरेंच्या खालोखाल आनंद दिघेंचं नाव येतंय. त्यांच्या ट्वीटमध्ये ते दिसून आलं होतं. आता एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवून ते भाजरवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे. तसे तर्क ठाण्यातील शिंदेंच्या समर्थकांकडूनही लढवले जात आहेत. यात मुख्य मुद्दा म्हणजे दिघे यांचा शिंदे यांच्याशी जोडला गेलेला वारसा ठाकरे आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, हे ध्यानात घेऊन एकनाथ शिंदे यांनी राजकीय खेळी असावी, असाही कयास बांधला जातो.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राहून पालिका निवडणुका लढवणं जड जाईल, याची कल्पना शिवसेनेच्या अनेक आमदारांना आलेली होती. एकनाथ शिंदेंनाही याची कूणकूण होतीच. शिवाय गेल्या वर्षभरापासून ते अस्वस्थ होते, असंही सांगितलं जातं. आमदारांच्या मागण्या आणि समर्थकांची खदखद, हा विषय कळीचा बनत गेला होता. शिवाय हिंदुत्वाचा मुद्दाही शिवसेनेसाठी आणि कट्टर शिवसैनिकांसाठी मोलाचा ठरत होता.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना हेरल्याचंही सांगितलं जातं. अशा शिवसेना आमदारांचा एक गट एकनाथ शिंदे यांनी उभा केला. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांना अपेक्षित असलेल्या हिंदुत्वासाठी सत्तेची लाचारी नको, अशी भूमिका समोर मांडली गेली. या सगळ्यात आनंद दिघे यांचं नावंही एकनाथ शिंदे यांची चतुराईने वापरलं.
या सगळ्यातच नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर सिनेमाचा वापरही खुबीनं केला गेल्याचा तर्क लढवला जातोय. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटाची निर्मिती करुन दिघेंना घराघरात पोहोचवण्यात आलं. त्यानंतर आपल्या राजकीय बंडात आनंद दिघे यांचं नाव वापरं ही शिंदे यांनी केलेली एक चतुर खेळी असल्याचंही मानलं जातं.
वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : महाविकास आघाडी विधानसभा बरखास्तीची शिफारस करणार
एकूण 56 | शिवसेना आमदार | मतदारसंघ |
---|---|---|
1 | एकनाथ शिंदे | कोपरी-पाचपाखाडी |
2 | गुलाबराव पाटील | जळगाव ग्रामीण |
3 | चिमणराव पाटील | एरंडोल |
4 | किशोर पाटील | पाचोरा |
5 | संजय गायकवाड | बुलडाणा |
6 | संजय रायमुलकर | मेहेकर |
7 | नितीनकुमार तळे | बाळापूर |
8 | संजय राठोड | दिग्रस |
9 | बालाजी कल्याणकर | नांदेड उत्तर |
10 | संतोष बांगर | कळमनुरी |
11 | राहुल पाटील | परभणी |
12 | अब्दुल सत्तार | सिल्लोड |
13 | प्रदीप जैसवाल | औरंगाबाद मध्य |
14 | संजय शिरसाठ | औरंगाबाद पश्चिम |
15 | संदीपान भुमरे | पैठण |
16 | रमेश बोरनारे | वैजापूर |
17 | सुहास कांदे | नांदगाव |
18 | दादा भुसे | मालेगाव बाह्य |
19 | श्रीनिवास वनगा | पालघर |
20 | शांताराम मोरे | भिवंडी ग्रामीण |
21 | विश्वनाथ भोईर | कल्याण पश्चिम |
22 | बालाजी किणीकर | अंबरनाथ |
23 | लताबाई सोनावणे | चोपडा |
24 | प्रकाश सुर्वे | मागाठणे |
25 | प्रताप सरनाईक | माजीवडा |
26 | सुनील राऊत | विक्रोळ |
27 | रमेश कोरगांवकर | भांडुप पश्चिम |
28 | रविंद्र वायकर | जोगेश्वरी पूर्व |
29 | सुनील प्रभू | दिंडोशी |
30 | दिवंगत रमेश लटके | अंधेरी पूर्व |
31 | दिलीप लांडे | चांदिवली |
32 | प्रकाश फातर्पेकर | चेंबुर |
33 | मंगेश कुडाळकर | कुर्ला |
34 | संजय पोतनीस | कलिना |
35 | सदा सरवणकर | माहिम |
36 | आदित्य ठाकरे | वरळी |
37 | अजय चौधरी | शिवडी |
38 | यामिनी जाधव | भायखळा |
39 | महेंद्र थोरवे | कर्जत |
40 | महेंद्र दळवी | अलिबाग |
41 | भरत गोगावले | महाड |
42 | ज्ञानराज चौगुले | उमरगा |
43 | कैलास पाटील | उस्मानाबाद |
44 | तानाजी सावंत | परांडा |
45 | शाहजी बापू पाटील | सांगोला |
46 | शंभूराजे देसाई | पाटण |
47 | योगेश कदम | दापोली |
48 | भास्कर जाधव | गुहागर |
49 | उदय सामंत | रत्नागिरी |
50 | राजन साळवी | राजापूर |
51 | वैभव नाईक | कुडाळ |
52 | दीपक केसरकर | सावंतवाडी |
53 | प्रकाश आबीटकर | राधानगरी |
54 | अनिल बाबर | खानापूर |
55 | सुजित मिंचेकर | हातकणंगले |
56 | उद्धव ठाकरे | विधान परिषद आमदार |