Eknath Shinde Cabinet : आषाढीपूर्वीच पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी, सुत्रांची माहिती, शिदे गटाचे आणि भाजपचे किती मंत्री शपथ घेणार?

| Updated on: Jul 07, 2022 | 6:15 PM

भाजपकडून 12 ते 14 जणांचा शपथविधी हा पहिल्या टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे. तर मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजेच दुसरा टप्पा आषाढी एकादशीनंतर पार पडण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Cabinet : आषाढीपूर्वीच पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी, सुत्रांची माहिती, शिदे गटाचे आणि भाजपचे किती मंत्री शपथ घेणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : राज्यात झालेल्या मोठ्या सत्तांतरानंतर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता या नव्या कॅबिनेटच्या (Maharashtra Cabinet) लगबगिने हालचाली सुरू आहेत. आत्ताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार काही मंत्र्यांचा शपथविधी हा आषाढी एकादशीपूर्वीच (Ashadi Ekadashi) होणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे गटातील पाच ते सहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून 12 ते 14 जणांचा शपथविधी हा पहिल्या टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे. तर मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजेच दुसरा टप्पा आषाढी एकादशीनंतर पार पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच आता राज्याला नवं कॅबिनंट मिळणार आहे.

शनिवारीच शपविधी होणार?

पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांच्या शपथविधीसाठी शनिवारचा दिवस निवडला जाण्याची ही दाट शक्यता आहे. राज्यात नवस सरकार स्थापन झाल्यापासून नव्या राजकीय समीकरणांना वेग आला आहे. अनेक जण मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी आणि अनेक जण आधी मंत्रिमंडळात असणारे आता चांगले खाते मिळावे, यासाठी धावपळ करताना दिसत आहे, फिल्डिंग लावताना दिसत आहेत. त्यामुळे आता आषाढीच पूर्वीच्या मंत्रिमंडळात पांडुरंग कुणाच्या पदरात कोणतं खाते टाकणार? याकडेही राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या शपथविधीची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

मंत्रिपदासाठीची रस्सीखेच वाढली

आषाढी एकादशी आधी 15 मंत्र्यांचा शपथविधी उरकण्याचा सरकारचा प्लॅन आहे, अशी माहिती खात्रीला एक सूत्रांनी दिली आहे, गेल्या अनेक दिवसापासून हा रखडलेला शपथविधी आता लगबगीने पूर्ण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शपथविधी लवकर उरकल्यास अनेक खात्यांची कामही लवकर मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांची चांगल्या मंत्री पदासाठी रस्सीखेच ही वाढत चालली आहे. सुरुवातीला काहीजण नाराज असल्याच्या चर्चाही आल्या होत्या, मात्र नंतर ही नाराजी शमवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले हे सांगण्यात आले.

कोणती खाती कुणाला मिळणार?

आज मुंबईत ही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठका पार पडल्या आहेत. यात कुणाला कुठली खाती मिळणार? याबाबतही चर्चा झाल्याची दाट शक्यता आहे. तसेच पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपच चित्रही काही स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना दिल्यामुळे भाजप काही महत्वाची खाती ही त्यांच्याकडे ठेवण्याची दाट शक्यता आहे.