मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ते राजकीय दसरा मेळाव्याकडे. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे( uddhav thackeray) यांची तोफ धडाडली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( cm eknath shinde) यांचा बाप काढला. एकनाथ शिंदे यांनी देखील BCK मैदानावरील दसरा मेळाव्यात बापचेच नाव घेऊन उद्धव ठाकरे यांना थेट उत्तर दिले.
बाप चोरणारी औलाद असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तुम्ही तर बापच विकण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला.
शिवसेना कुणाची याचीा लढाई उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात सुरु आहे. शिवसेना पक्षाने तिकीट दिल्याने आमदार झाला, मुख्यमंत्री झाला, आता शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं आहे. शिवसैनिक शिवसेनाप्रमुख स्वीकारणार का? लायकी आहे का असं उद्धव ठाकरे म्हणाले.
स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा होता. काय दिवटं कारटं माझ्या पोटी जन्माला आलं. माझ्या ऐवजी दुसऱ्यांच्या वडिलांचं नाव लावतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेचा बाप काढला.
आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. त्यांच्याविचारांचे पाईक आहोत. तुम्ही म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झाली. बाप चोरणारे म्हणता. तुम्ही तर बापाचे विचारच विकले. तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.