नवी दिल्ली : अडीज वर्षानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या चर्चेला वेग आलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात गृहमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतरच मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागेल असे संकेत सत्ताधारी वर्तुळातून दिले जात आहेत. कालच्या बैठकीत सरकारमध्ये प्रामुख्याने नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचं भाजपचे धोरण असल्याची माहीती आहे. गृह खातं मिळावं यासाठी फडणवीस आग्रही आहेत. तरर हे खातं यंदा त्यांच्याऐवजी भाजपच्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्याकडे देण्यावर अमित शाह यांचा भर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांचं नाव गृहमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याची माहीती आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतरच्या प्रस्तावित संघटनात्मक बदलामध्ये प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा नेमला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या चर्चेला वेग आलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गृहमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मंत्रिमंडळातील एकूण 43 मंत्र्यांपैकी शिंदे गटाने 10 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याची केली आहे. तर भाजपला 28 मंत्रिपदे देण्याचं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. गृहखातं फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र, त्याला अद्याप भाजपमधून कोणीही दुजोरा दिलेला नाही.
शहा यांच्यासोबत चार तास चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस आज भाजपच्या नेत्यांना दोन टप्प्यात भेटणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस मुख्यमंत्री शिंदे हे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून करणार आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आज सायंकाळीच ते खासगी विमानाने थेट पुण्याला रवाना होणार आहेत. तिथून पुढे पंढरपूर इथे शासकिय पुजेसाठी जाणार आहेत.