मुंबई : नाराज एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. शिंदे सध्या 35 आमदारांसह सुरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरचं शिवसेनेचं (Shivsena) नाव हटवलं आहे. यामुळे शिंदेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, असं बोललं जातंय. महाविकास आघाडी सरकार शिंदेंच्या बंडाळीमुळे सरकार पडण्याची शक्यता आहे. यातच आता एकनाथ शिंदे गटनेते पदावरुन मागे हटणार नसून त्यांच्याकडे 35 आमदार असल्यानं गटनेतेपदावरुन त्यांना हटवलं जाऊ शकत नाही, असा कयास बांधला जातोय. तर शिवसेनेकडे फक्त चौदा आमदार राहिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंचा गट, अशी परिस्थिती सध्या शिवसेनेत निर्माण झाली आहे.
आमदारांच्या बैठकीत अजय चौधरी यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आलीय. एकनाथ शिंदे आमचे सहकाही आहेत, आमचे मित्र आहेत. अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम केलं आहे. नक्कीच बाळासाहेब ठाकरे असतील, ते म्हणतात त्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे असतील. या सगळ्यांसोबत एकत्र काम केलं आहे. मुळात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होऊ शकतात. शेवटी शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे. त्यामुळे मी त्यांना आवाहन केलं आहे की मुंबईत या आपण चर्चा करू. तिथे जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही.
एकनाथ शिंदे यांनी एक महत्वपूर्ण ट्विट केलंय. त्यावरुन वेगवेगळे कयास बांधले जातायतय.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातील हलचालीही चांगल्याच वाढल्या आहेत. शिवसेने तातडीची बैठक घेत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधान सभेतील गटनेतेपदावरून हटवलं आहे. त्यांच्या ठिकाणी गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुजरातमध्येह अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.