मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचं बंड झाल्यापासून आणि ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) जाऊन एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार आल्यापासून राज्यातल्या राजकारण हे तापलेलेच आहे. मात्र अशातच सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत (Uddhav Thackeray Sanjay Raut Interview) यांनी मुलाखत घेतली आणि या मुलाखतीचा पहिला भाग सोमवारी प्रसिद्ध झाला आहे. तसेच या मुलाखतीचा दुसरा भाग हा बुधवारी प्रसिद्ध झाला. त्यामध्ये आता भाजप सोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी भर सभेत भाजप त्रास देत आहे म्हणत राजीनामा दिला होता, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना करून दिली आहे. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांना काही खोचक सवाल ही केले आहेत.
या क्लिपबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री होईल असं मी कधीही बोललो नव्हतो, तेव्हा मला एक आव्हान स्वीकारावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टी ठरवल्यानंतर नाकारण्यात आल्या. त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावं लागलं. मी मुख्यमंत्री झालो, आता मी होऊन गेलेला आहे, पण प्रॉब्लेम काय तुम्हाला? ज्या बाळासाहेबांचा फोटो लावताय त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवलं? इतकी अडीच वर्ष किंवा त्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्याची क्लिप वायरल होत आहे. तेव्हा भाजप कसा अत्याचार करतो आहे हे सांगत राजीनामा दिला होता, ही क्लिप आहे, माझ्या समोर त्यांनी राजीनामा दिला होता आणि ते स्वतः बोलत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्या क्लिपचाही हिशोब काढला आहे.
तसेच भाजपने अधिक शत्रूंना न वाढवता, एक ज्याला आपण आरोग्यदायी राजकारण म्हणतो ते करावं, आम्ही 25-30 वर्ष त्यांच्यासोबत होतो. तेव्हा त्यांनी 2014 ला युती तोडली. कारणं काहीही नव्हती. तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाहीये. तेव्हाही भाजपच्या आणि शिवसेनेची युती ही शेवटच्या क्षणाला तुटली होती. आम्ही मित्र होतो तुमच्या आम्ही काय मागत होतो? मी आत्तासुद्धा अडीच वर्षेच मुख्यमंत्रीपद शिवसेनेसाठी मागत होतो, त्याचं कारण असं की मी सरत्या काळामध्ये माननीय शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल आणि तसं बघितलं तर माझं ते वचन अजूनही अर्धवट आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.