मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत एकूण 35 आमदार असल्याच्या दावा करण्यात आला आहे. गुजरातमधील भाजप नेत्यानं याबाबतचा दावा केलाय. याआधीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 आमदार असल्याचं सांगितंल जात होतं. दरम्यान, आता तर तब्बल 35 आमदार असल्याचाही दावा भाजपच्या गुजरातमधील एका नेत्याने केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडालीय. शिवसेनेचे आमदार फुटल्यास महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येण्याची भीती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय.
गुजरामधील ऑपरेशन लोटसची जबाबदारी सीआर पाटील यांच्याकडे सोपण्यात आल्याचंही कळतंय. त्यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. सीआर पाटील हे नवसारीचे खासदार असून त्यांनी महाराष्ट्रातील आमदारांशी संपर्क साधल्याचंही खात्रीलायक वृत्त समोर आलंय. सीआर पाटील यांच्यासोबतच गुजरात राज्याचे गृहमंत्रीही त्यांच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंसोबत सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्तही करण्यात आला आहे.
गूजरातचे भाजपचे गृहमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नैतृत्वात ऑपरेशन लोटस राबलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. गुजरातचे भाजपचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि भाजपचे खासदार तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांचा ली मॅरिडीयनमध्ये मुक्काम आहे. हे दोन्ही नेते आमदारांसोबत ठाण मांडून बसलेत.
1. एकनाथ शिंदे
2. शंभूराज देसाई
3. अब्दुल सत्तार
4. संदीपान भुमरे
5. भरत गोगावले
6. महेंद्र दळवी
7. संजय शिरसाठ
8. विश्वनाथ भोईर
9. बालाजी केणीकर
10. किमा दाबा पाटील
11. तानाजी सावंत
12. महेश शिंदे
13. थोरवे
14. शहाजी पाटील
15. प्रकाश आबिटकर
16. अनिल बाबर
17. किशोर अप्पा पाटील
18. संजय रायमुलकर
19. संजय गायकवाड
20. शांताराम मोरे
21. लता सोनवणे
22. श्रीनिवास वणगा
23. प्रकाश सुर्वे
24. ज्ञानेश्वर चौगुले
25. प्रताप सरनाईक
26. यामिनी जाधव
नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.