मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवणारे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आजच विधानसभा उध्यक्षांना एक पत्र पाठवलं. हे पत्र नव्या प्रतोद यांची नियुक्ती करणारं होतं. या पत्रावर 34 आमदारांच्या सह्या (MLA Signature latter) होत्या. मात्र या या पत्रावर तिसरी सही असणारे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी ही आपली सही नसल्याचे म्हटल्याने आता या पत्रावरील सह्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पत्रावरील या सह्या खोट्या आहेत का? असा सवाल आता राज्याच्या राजकारणात विचारण्यात येत आहे. या पत्रावर अजूनही 33 आमदारांच्या सह्या आहेत. नितीन देशमुख यांच्या दाव्यानंतर आता इतर सह्यांवरही संशय घेतला जात आहे. त्यामुळे या सह्यांचीही पडताळणी होण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी विधान सभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहीत, मुख्य प्रतोद पदावरून सुनिल प्रभुंना बटवत असल्याचे आणि भरत गोगावले यांची नियुक्ती करत असल्याचे सांगितले होते.
ही सही कुणी केली मला माहिती नाही. ही सही 21 तारखेला करण्यात आली आहे. या अर्जावर माझी सहीच नाही, हे माझं अक्षरही नाही, तसेच मी मराठीत सहीच करत नाही, माझी सही ही इंग्रजीत असते. असेही देशमुख म्हणाले आहेत. त्यामुळे आता या सह्या कुणी केल्या? याचाही शोध घेतला जाऊ शकतो.
तसेच इंजेक्शन टोचले हे वास्तव आहे. मी निघताना मोठा वाद झाला. गुजरातचे पोलीस प्रशासन आहेत की पक्षाचं काम करतात हे माहिती आहे. मला रस्ते माहिती नाही, पाणी होतं, माझ्या मोबाईलची बॅटरी संपत होती. माझ्या मागील पोलिसांचा ताफा कोणतेही वाहन थांबू देत नव्हते. मी माझ्या नेत्यांशी संपर्क साधत होतो. तेव्हाच लोकांनी मला उचलून सरकारी दवाखान्यात नेते. मला त्यांच्या चेहऱ्यांच हावभाव पाहून मला माझ्या घाताची शंका आली. मला अॅटक आला म्हणून सांगा असे म्हणाले. मात्र मला शंका आली. वीस पंचवीस लोकांनी मला पकडलं, असेही ते म्हणाले.
मला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, मला कोणताही त्रास होत नाही. मग मला दवाखान्यात का नेलं हा विचार माझ्या मनात आला. सकाळपर्यंत मी कोणत्याही डॉक्टरला माझ्या अंगला हात लावू दिला नाही. तेव्हा सर्वांनी मला पकडून सुई टोचली. तुम्ही सीसीटीव्ही काढून बघा, अशा दावाही नितीन राऊत यांनी केला आहे. मला अटॅक आला हे सांगून माझा घातपात करण्याचा डाव हा गुजरात सरकारचा होता, असा थेट आरोप देशमुख यांनी केला आहे.