Eknath Shinde : शिंदेसाहेब राज्यपालांना भेटायला जाणार का? टीव्ही 9 शी बोलताना एकनाथ शिंदेंनी स्पष्ट उत्तर दिलं! पाहा काय म्हणाले?

| Updated on: Jun 24, 2022 | 9:20 AM

एकनाथ शिंदे हे राज्यपालांना भेटायला जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. टीव्ही 9 शी बोलताना एकनाथ शिंदे यांनी याचे उत्तर दिले आहे.

Eknath Shinde : शिंदेसाहेब राज्यपालांना भेटायला जाणार का? टीव्ही 9 शी बोलताना एकनाथ शिंदेंनी स्पष्ट उत्तर दिलं! पाहा काय म्हणाले?
एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मात्र शिवसेनेचे (shivsena) आमदार कमी होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे राज्यपालांना भेटायला जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. टीव्ही 9 शी बोलताना एकनाथ शिंदे यांनी याचे उत्तर दिले आहे. आज आमची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. आजूनपर्यंत तरी राज्यपालांची भेट घेण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच त्यांना यावेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याबाबत विचारले असता त्यांच्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

 पुढची रणनिती  बैठकीनंतर

12 आमदारांच्या सदस्यत्त्वाबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, हे सर्व अवैध आहे. त्यांच्याकडे अधिकारच नाही. आमच्याकडे मॅजिक फिगर आहे. सभेला आले नाही म्हणून निलंबन कसे होऊ शकते. आम्हालाही कायदा माहित आहे. लोकशाहीत आकड्याला महत्त्व असते. हे सर्व आम्हाला घाबरवण्यासाठी करण्यात येत आहे. मात्र आमची एकजूट आहे. आम्ही 37 आमदारांचे पत्र सादर केले आहे. ज्याच्याकडे 37 आमदार असणार तोच जिंकणार शिवसेनेचा व्हिप चुकीचा आणि अवैध आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टही तो अवैध ठरवेल. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आमची पुढची रणनिती आजच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल असे शिंदे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

भास्कर जाधव नॉट रिचेबल

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे नॉटरिचेबल आहेत. कालपर्यंत भास्कर जाधव हे शिवसेनेसोबत होते. मात्र आज त्यांचा फोन लागत नसल्याने ते देखील शिंदे गटात सहभागी झाले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी मात्र आपला भास्कर जाधव यांच्याशी संपर्क झाला नसल्याचे म्हटले आहे. तसेच भास्कर जाधव कुठे आहेत हे देखील आपल्याला माहित नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. तर शिवसेनेच्या गटातील आमदारांची संख्या कमी होत आहे. भास्कर जाधव यांच्यासह शिवसेनेकडे 15 आमदार होते. मात्र आता भास्कर जाधव यांचा फोन देखील लागत नसल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे.