ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची कन्नी कापणार?, मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीची जोरदार चर्चा

| Updated on: Nov 16, 2022 | 12:11 PM

एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची कन्नी कापणार?, मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीची जोरदार चर्चा
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेगट आणि वंचितच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा ठाकरेगट आणि वंचित आघाडी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट महत्वपूर्ण आहे.

प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

आघाडीची बोलणी

एकनाथ शिंदे यांनी फारकत घेत भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली.त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंशी आघाडी संदर्भात बोलणी केली होती. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.

युतीची शक्यता?

ठाकरे आंबेडकर एका व्यासपिठावर दिसणार आहेत. ठाकरेगट आणि वंचितची आघाडी होणार असल्याच्या चर्चा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंबेडकरांना भेटणार आहेत. त्यामुळे आघाडी आधी ही युतीची नांदी असल्याचं बोललं जात आहे.

युतीला बळकटी आणण्याचा प्रयत्न

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महायुतीला राज्यात आणखी बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंचा मनसे पक्ष महायुतीत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर आता प्रकाश आंबेडकर यांनाही युतीत सहभागी होण्याबाबत आवाहन केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. मनसे आणि वंचित जर महायुतीत सामील झाले तर राज्यात युती आणखी बळकट होण्यास मदत होईल.