ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde chief Minister) हे लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे अनेक किस्से सांगितलं जातात. ठाण्यात (Ekanth Shinde Thane News) त्यांनी अनेकांच्या मदतीला धावून जात, लोकांची आयुष्य सावरली असल्याचे अनेक किस्से सांगितलं जातात. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांच्या शेजारी राहत असलेल्या एका व्यक्तीनं एक अत्यंत खास आठवण सांगितली आहे. 1989 साली एकनाथ शिंदे यांनी एका चिमुरड्याचा जीव वाचवला होता. तेव्हा एकनाथ शिंदे हे रिक्षा (Eknath Shinde Auto Rikshaw driver) चालवण्याचं काम करायचे. समाजात ज्याला जेव्हा केव्हा गरज लागेल, तेव्हा तेव्हा त्याच्या मदतीला उभं राहणारा हा माणूस होता, असं एकनाथ शिंदे यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितलं. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलंय. एकनात शिंदे 35 वर्ष चाळीत राहिले. ते एका गरीब, सर्वसामान्य कुटुंबात लहानाचे मोठे झाले. गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झालेत.
एकनाथ शिंदे यांनी आपलं आयुष्य समाजाला वाहून दिलं होतं. ते झोकून देऊन लोकांची सेवा करण्यासाठी धावून जायचे, असंही त्यांच्या शेजारी राहाणाऱ्या एका व्यक्तीने म्हटलंय. 1989 साली झालेल्या मुंबईतील दंगलीवेळी स्वतः रिक्षा चालवत त्यांनी एका मुलाचा जीव वाचवला आणि त्याला आणि त्याच्या आईला वेळीच रुग्णालयात पोहोचवलं होतं. त्या वेळी प्रवासाचं दुसरं कोणतंच साधन या मायलेकाकडे नव्हतं. आता करायचं काय? असा प्रश्न निर्माण झाला होता.
परिस्थिती बेताची होती. बाहेर तणाव होता. प्रवासाचं साधन नसल्यानं करणार काय? हा प्रश्न चिमुरड्याचा आईला सतावू लागला होता. यावेळी एकनात शिंदे यांनी आपल्या रिक्षातून, स्वतः रिक्षा चालवत तणावाच्या परिस्थितीतून त्या आई आणि चिमुरड्याला हॉस्पिटलपर्यंत नेलं. शिंदेंनी दाखवलेल्या प्रसंगावनधानामुळे हा चिमुरडा बालंबाल बचावला होता, असं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं सांगितंलय. शिंदे क्वचितच आराम करत असतील, पण नेहमीच लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात, असंही या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं म्हटलंय.
गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन देवेंद्र फडणवीसांसोबत शिंदे यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधी बुधवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. बहुमत चाचणीला सामोरं जाण्याचं आव्हान त्याच्यासमोर उभं ठाकलं होतं. मात्र त्याआधी नैतिकदृष्ट्या उद्धव ठाकरेंनी आपण राजीनामा देत असल्याचं घोषित केलं होतं.