मुंबई : एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maharashtra Government) काहीही आलबेल नाही, असं स्पष्ट होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil on Eknath Shinde) यांनी मोठं विधान केलंय. सरकार पडेल, अशी शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मला वाटत नाही की सरकार अल्पमतात येईल. शिवसेनेच्या सर्व विधानसभेच्या सदस्यांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली काम करणं स्वीकारार्ह राहिल. आमदार गेलेले असले तरी शिवसेनेचे सगळे आमदार (Shiv sena MLA) परत येतील.’ असं महत्त्वपूर्ण वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोल सावरण्याच्या अनुशंगाने या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस देखील आता सतर्क झाली आहे. काल शरद पवार दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली.
यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ही बैठक होईल. या बैठकीच्या आधी जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. तर बैठकीआधी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा झालीये. तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाल्याचं समोर आलंय. आता या बैठकीनंतर शरद पवार नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचंय. तसंच आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याही बैठक होण्याची शक्यता आहे. तसंच आज कॅबिनेट बैठकही घेण्याची शक्यताय.
एकीकडे राष्ट्रवादीची बैठक तर दुसरीडे भाजपच्या गोटातूनही मोठी बातमी येतेय. भाजपनेही आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर शिवसेनेचे शिंदेंसोबत न गेलेले आमदार मुंबईतील हॉटेलात असून आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत आहेत. शिंदेंसोबत न गेलेल्या आमदारांना सेट रेगिस या हॉटेलात ठेवण्यात आलेलंय.
वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये राहण्याची सोय