खरा मुख्यमंत्री कोण हे माहित नाही? एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या टार्गेटवर

| Updated on: Sep 24, 2022 | 6:25 PM

खरा मुख्यमंत्री कोण हे मला पण अजून कळलं नाही. महाराष्ट्रातील तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. मात्र हे सरकार खोक्यांच्या मागे लागले आहे. ह्याला फोडू की त्याला फोडू असं या गद्दारांचे राजकारण सुरु आहे असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना टार्गेट केले.

खरा मुख्यमंत्री कोण हे माहित नाही? एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या टार्गेटवर
Follow us on

पुणे : वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मावळमध्ये जनआक्रोश आंदोलनात करण्यात येणार आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. खरा मुख्यमंत्री कोण हे माहित नाही? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला.

खरा मुख्यमंत्री कोण हे मला पण अजून कळलं नाही. महाराष्ट्रातील तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. मात्र हे सरकार खोक्यांच्या मागे लागले आहे. ह्याला फोडू की त्याला फोडू असं या गद्दारांचे राजकारण सुरु आहे असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना टार्गेट केले.

आपण कुठच्या खुर्चीवर बसलो आहोत हे त्यांना माहित नाही. खुर्चीवर कोण बसले हे देखील त्यांना  माहिती नाही. खुर्चीचा एक वेगळा मान असतो. खुर्चीचा किस्साच वेगळा आहे.

खोके सरकारच्या नेत्यांनी तरुणांची स्वप्न मोडून तोडून त्यांचे रोजगार इतर राज्यांमध्ये पाठवण्याचं काम केले आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे घटना बाह्य आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असा जाहीर दावा देखील आदित्य ठाकरे यांनी सभेत केला.

शिवसेनेची बदनामी सुरु आहे. शिवसेना संपवण्याचा डाव सुरु आहे. शिवसनेने 40 वार पाठीवर घेतलेले आहेत.अजून किती वार करायचे तेवढे करा.

हिंमत असेल तर समोरुन वार करा. ज्या दिवशी जेव्हा तुम्ही सुरतला पळून गेलात. जेवढी मेहनत तुम्ही पळण्यासाठी घेतली होती. तेवढीच जर मेहनत आज या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केली असती ना तर ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचली असती असेही आदित्य ठाकरे म्हणाले.