मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा भूंकप झाल्यानंतर आता सत्तानाट्य अंतिम टप्प्यात असल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने आता अधिकृतपणे सत्तासंघर्षात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळतंय. काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर आत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतलीय. तसंच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर भाजप आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यात लवकरच सत्तापालट होणार अशी दाट शक्यता असल्याचं बोललं जातंय.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.