मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर 7 दिवस उलटले. अशास्थितीत महाविकास आघाडी सरकार टिकणार की पडणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकार टिकणारच असा दावा केला जातोय. तर विरोधकांकडून सरकार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशास्थितीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत. त्याचवेळी शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही आज गुवाहाटीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेकडील मंत्र्यांची संख्या आता केवळ 4 वर येऊन ठेपली आहे. तर शिवसेनेतील 10 मंत्री शिंदे गटात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासह एकूण 15 मंत्रिपदं आली होती. त्यात मुख्यमंत्रीपद, 9 कॅबिनेट मंत्रिपद आणि 4 राज्यमंत्री पदांचा समावेश होता. त्यातील 3 मंत्रिपदं शिवसेनेनं सहयोगी पक्ष आणि अपक्षांना दिलं होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता शिवसेनेकडे केवळ मुख्यमंत्री, 3 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्री उरले आहेत. तर शिंदे गटात एकूण 8 कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्री सहभागी झाले आहेत.
>> उद्धव ठाकरे – (मुख्यमंत्री) – सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय – खाती
>> सुभाष देसाई – उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
>> आदित्य ठाकरे– पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
>> अनिल परब – परिवहन, संसदीय कामकाज
>> शंकरराव गडाख – (कॅबिनेट मंत्री) मृदा व जलसंधारण
>> बच्चू कडू – (राज्यमंत्री) जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक वि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार
>> राजेंद्र यड्रावकर – (राज्यमंत्री) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य