Eknath Shinde News, Maharashtra Politics LIVE : आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय (Maharashtra Political Crisis) वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आजचा आठवा दिवस आहे. 21 जून रोजी रातोरात आमदार सूरतला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गुवाहाटीला रातोरात दाखल झाले. तेव्हा पासून गुवाहाटीच्या रिडेसन ब्लू हॉटेलात या आमदारांचा मुक्काम आहे. महाविकास आघाडी सरकारमधून (MVS vs BJP) बाहेर पडा, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सुरुवातील एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या समर्थनाची संख्या पुढे पुढे वाढत गेली. आपल्याकडे 50 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यापैकी 38 शिवसेना आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. तर यात 9 अपक्ष आमदारही आहेत.
शिवसेनेचे कोण कोण आमदार सोबत?
सत्ता हे जनसेवेचे साधन असल्याची भावना
ज्या पद्धतीने राजीनामा दिला, म्हणून भाजप पेढे वाटतात, याचा बदला महाराष्ट्रातील जनता बदला घेणार
मुख्यमंत्र्यांकडू अनेक चांगले निर्णय
बहुमत गमवल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा लागला
उद्धव ठाकरे यांच्याविषयी नेहमीच सकारात्मक संबंध राहीर
शिवसेना नेमकी कोणाची, त्यांच्याबद्दल संघर्ष करण्याचा विचार नाही
आताच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणार
राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला
राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांचेकडे सुपूर्द केला.
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांचेकडे सुपूर्द केला.
राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे. pic.twitter.com/2RDIfcFNfB
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 29, 2022
उद्धव ठाकरे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी;
नवे मुख्यमंत्री येईपर्यंत असणार जबाबदारी
शिवसैनिकांच्या जोरदार घोषणाबाजी
उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना
बंडखोर आमदारांवर कार्यर्त्यांची टीका
बंडखोर आमदार घाबरलेः शिवसैनिकांची टीका
उद्धव ठाकरे राजीनामा देऊन मातोश्रीकडे रवाना
माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया नाही
सोबत आदित्य ठाकेर
शिवसैनिकांचा ताफाही परतला
शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
उद्धव ठाकरेंनी राजीनामा राज्यपालांकडे सोपविला
मुख्यमंत्री पदावरून पायउतार
यापुढे शिवसैनिकांकडे लक्ष देणार
बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाणार
मुख्यमंत्री पद सांभाळताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार
भाजप आमदारांनी मुंबई सोडू नये
अडीच वर्षानंतर स्थापन होणारे सरकार 25 र्षे टिकेल
आधी शपथ विधी करू त्यानंतर जल्लोष करू
आम्ही दुःख व्यक्त केले
आमच्या नेत्याला आमच्यापासून लांब घेऊन गेले
50 आमदारांचा विचार उद्धव ठाकरे यांना सांगितला होता.
या सगळ्या परिस्थितीली संजय राऊत जबाबदार
संजय राऊत 50 टक्के शिवसेनेचे 50 टक्के राष्ट्रवादीचे
मोठ्या नेत्यांमुळे बंडखोर आमदारांमध्ये कटूता
संजय राऊत यांचे नाव घेऊन टीका
पक्षप्रमुख म्हणून संपर्क कमी होत गेला
आमच्यासाठी हा दुःखद प्रसंग
एकनाथ शिंदे सगळ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेतील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राजभवनवर
कडेकोट पोलीस बंदोबस्त.
विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा
उद्धव ठाकरे आज राजीनामा देणारं आहेत याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती नव्हतं. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन घोषणा केली त्यावेळीं आपल्याला आणि शरद पवार यांना माहिती मिळाली. शरद पवार यांना याच आश्चर्य वाटलं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
राज्याच्या राजकारणात मविआचा अद्भुत प्रयोग आमचे नेते शरद पवार यांनी केला. तिन्ही पक्ष शरद पवारांनी एकत्र केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून अनेक योजना, सेवा देण्याचा प्रयत्न सरकारने केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. एक सरळ, लोकांच्या कटिबद्धतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री राज्याला मिळाला होता. राज्यात गेले अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका शरद पवारांनी स्वीकारली. शाहू, फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. हे सरकार खूप चांगले चालले. शिवसेनेचे काही आमदार दुर्देवाने दुरावे, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पायउतार होण्याचं निर्णय घेतला. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी खूप चांगले काम केले. प्रशासनानेही केले. देशासमोर एक नवा आदर्श ठेवला. राज्याला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे दीर्घकाळ स्मरणात राहतील. पुढे एकत्र राहणार की नाही, हे आगामी काळात बसून ठरवू. जे आमदार अजित पवार आणि राष्ट्रवादीने मदत दिली नाही म्हणतात, त्यांच्या मतदारसंघात किती निधी वाटप केले याची यादीच जयंत पाटील यांनी वाचून दाखवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या खात्याला १२ हजार कोटींना निधी दिला होता. हेही जयंत पाटील यांनी सांगितले.
मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले.मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले.काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते.
अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही! pic.twitter.com/j45C3WRTq8— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ने अत्यंत शालीनता से पदत्याग किया.हमने एक संवेदनशील, सभ्य मुख्यमंत्री खो दिया.इतिहास गवाह है कि धोखाधड़ी का अंत अच्छा नहीं होता.ठाकरे जीते.यह शिवसेना की शानदार जीत की शुरुआत है.लाठियां खाएंगे,जेल जाएंगे, पर बालासाहेब की शिवसेना को दहकती रखेंगे! pic.twitter.com/2PScxCzbxV
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजपा सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते १ जुलैला होण्याची शक्यता आहे. उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे.
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राजीनामा पत्र देण्यासाठी राजभवनाकडे निघाले आहेत. राज्यपालांना भेटून राजीनाम्याचे पत्र देणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या विधान परिषद आमदारकीचाही राजीनामा देणार आहेत.
सगळ्याच गोष्टींचा निकाल लागलेला आहे. गेले अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारने बदल्याचं राजकारण केलं. आता नव्या सरकारकडून अपेक्षा आहे आणि त्या पूर्म होतील असा विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे संभाजीनगर नामांतरण झाले. त्याचे श्रेय एकनाथ शिंदे आहे. अशी प्रतिक्रया नितेश राणे यांनी दिली आहे.
शिवसेनाप्रमुखांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी संपवली अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यात चांगले सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबादच्या नामकरणाचा निर्णय हा सत्ता जाताना घेतला अशी टीकाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जल्लोष पसरलेला आहे. देवेंद्र फडणवीसांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढे भरवलेले आहेत. भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत आहेत. फडणवीस यांचा शपथविधी एक दोन दिवसांत होईल, तो अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवा होता, अशी प्रतिक्रिया गणेश नाीक यांनी दिली आहे.
आजपर्यंत तुम्ही मला भरभरुन प्रेम दिलेत. मी जे सांगत होतो ते तुम्ही ऐकलंत. देशात कुठे दंगली झाल्या नाहीत. सीएए एनआरसीवेळी देशात दंगे पेटले होते, त्यावेळी इथे काही झाले नाही. राज्यातील मुस्लीम बांधवांचे आभार मानतो. आलोही अनपेक्षितपणे, जातोयही अनपेक्षितपणे. आता पुन्हा शिवसेना भवनात बसणार आहे. पुन्हा तरुण तरुणींशी भेटतो आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाहीत.
उद्या या बंडखोरांना राज्यात येऊ द्या. राज्यात उद्या सत्तेचा नवा पाळणा हलतो आहे. चीन सीमेवरील सुरक्षा काढून मुंबईत का आणता. विधानभवनात कुणाकडे किती आमदार आहेत, हे तिथे ठरेल ना. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य जर यांना मिळत असेल तर त्यांना मिळू दे. मुख्यमंत्री हे पापाचं फळ असेल तर ते मी भोगतो. सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करीत आहे.
विश्वासमत चाचणी करण्याचा आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही हा निर्णय दिला आहे. विरोधी पक्षांनी पत्र दिल्यानंतर तातडीने राज्यपालांनी हा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार. पण हीच तत्परता जर राज्यपालांनी १२ आमदारांबाबत दाखवली असती, अजूनही केलीत, तर तुमच्याबद्दल आदर वाढेल. जे दगा देणार म्हणत होते, त्यांनी दगा दिला नाही. त्यांनी पाठिंबा दिला. ज्यांची नाराजी आहे, त्यांची नाराजी का आहे, हे मला समोर येऊन का सांगितले नाही. तुमच्या भावनांचा मी आदर करतो, पण तुम्ही माझ्यासमोर येऊन बोला. आवाहन करुनही आमदार समोर आले नाहीत. मुंबईत आता बंदोबस्त वाढवतायेत. अनेकांना स्थानबद्ध करतायेत. चीन सीमेसारखी परिस्थिती इथे निर्माण झाली आहे.
मी मनापासून बोलत आहे. सामान्य माणसांना शिवसेनाप्रमुखांनी आमदार-खासदार केलं. ही माणसं मोठी झाल्यानंतर तेच आपल्याला विसरायला लागले. ज्यांना ज्यांना द्यायचं होतं ते सगळं दिलं, ते नाराज . रिक्षावाले, पानपट्टीवाल्यांना नगरसेवक, मंत्रीपद दिलं. ज्यांना काही दिलं नाही ते आता सोबत आहेत.
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जनसंवादाला सुरुवात झालेली आहे. आपल्याशी संवाद साधून मी अश्वस्त केलं होतं, जे आपण चालू ठेवलं होतं, ते चालूच राहील. आत्तापर्यंतच वाटचाल चांगली झाली. सरकारला कर्जमुक्त केलं. या सगळ्या धबडग्यात काही गोष्टी मागे पडतात. आज जगणं सार्थी झाल्यासारखं वाटलं. औरंगाबादचं संभाजीनगर झालं आणि उस्मानाबादचं धाराशीव झालं. काँग्रेस-राष्ट्रवादीने याला विरोध केला नाही. हा निर्णय होताना शिवसेनेचे चारच मंत्री उपस्थित होते, बाकी कुठे होते ते तुम्ही जाणताच.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनसंवाद साधत असतानाच, त्यांचे विश्वासू आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अनिल परब कोणता महत्त्वाचा निर्णय किंवा लिफाफा राज्यपालांकडे देतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही क्षणात जनसंवाद साधणार आहे. सुप्रीम कोर्टाने विश्वासत चाचणी होणारच, या दिलेल्या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत, ते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते ाहे.
उद्याच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात पहिल्यांदाच व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभेतील सदस्याला जागेवर उभे राहून मतदान करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. हे असे पहिल्यांदाच घडते आहे. तसेच 11 जुलैला सदस्यत्वांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत काय निर्णय होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता पुढे काय होईल, असे पाहावे लागेल. असे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका करण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे निकम यांनी सांगितले.
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे. बहुमत चाचणीच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. आजच्या जनता संवादावेळीच ते ही घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ९.३० वजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. बहुमत चाचणीच्या आधीच ते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलमध्ये असलेले मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उद्याच्या विश्वासमत चाचणीला उपस्थित राहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला परावानगी दिली आहे. यापूर्वी राज्यसभा आणि विधान परिषद निवडमुकीत मतदानाला हजर राहता आले नव्हते.
मुंबई- बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे उद्या सकाळी ११ वाजता विश्वासमत चाचणीला सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी ठाकरे सरकारचा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली – उद्या राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार, सुप्रीम कोर्टाने या चाचणीला दिलेले आव्हान फेटाळले आहे. राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीला सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. यावर तीन तास सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. उद्या ठाकरे सरकारचा फैसला सभागृहात होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला होता.
नवी दिल्ली – राज्याच्या विशवासमत चाचणीवर काही क्षणात निर्णय होणार आहे. तिन्ही पक्षांचे वकील कोर्टरुममध्ये दाखल झाले आहेत.
मुंबई – 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक फणसळकर यांची नियुक्ती मुंबईच्या नव्या पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे. 30 जून रोजी विद्यमान पोलीस आयुक्त संजय पांडे सेवानिवृत्त होत आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारच्या जवळचे संजय पांडे यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते, असे सांगितले जात होते. तथापि, राज्याच्या गृह मंत्रालयाने अधिकृत प्रेस रिलीज जारी करत विवेक फडणसळकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
नवी दिल्ली – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य ठरवणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही वेळातच होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी उद्या बहुमतचाचणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्याला सरकारने आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झाला, आता थोड्याच वेळात त्यावर निर्णय येणार आहे. राज्यातील आमदार, सरकार यांचा निर्णय यातून होणार आहे.
गुवाहाटी- आम्ही मुंबईला उद्या पोहचणार आहोत, विश्वासदर्शक ठरावात सर्व आमदार सहभागी होणार, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठराव नक्की जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पुढील कारवाई सर्व आमदारांसोबत बोलून ठरुन कोर्टाचा निर्णय लागेल त्यानुसार पुढची कारवाई होईल उद्याचं अधिवेशन बोलावलं आहे, त्या कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान होईल उद्या विश्वासदर्शक ठरावानंतर पुढची प्रक्रिया होईल. विश्वासदर्शक ठराव नक्की जिंकणार काँग्रेस-राष्ट्रवादीला मी काय सल्ला देणार, ते त्यांचा निर्णय घेतील. असे ते म्हणाले.
नवी दिल्ली – विश्वासमत चाचणीला देण्यात आलेल्या आव्हानावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, आता यावर रात्री 9 वाजता सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. शिवसेनेकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद करत राज्यपाल हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. आधी अपात्रतेचा निर्णय व्हावा आणि नंतर बहुमत चाचणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र शिंदे गटाचे वकील, राज्यपालांचे वकील आणि सॉलिसिटर जनरल यांनी राज्यपालांचा निर्णय योग्यच असल्याचा दावा केला आहे.
अभिषेक मनु सिंघवी – बहुमत चाचणी आणि अपात्रता हे एकमेकांशी संबंधित आहे.
अभिषेक मनु सिंघवी – राज्यपाल एकतर्फी निर्णय घेत आहेत
अभइषेक मनु सिघवी – अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, बहुमत चाचणी एका आठवड्याने व्हावी.
पुन्हा शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवादासाठी उभे राहिलेत.
अभिषेक मनु सिंघवी – हे तेच राज्यपाल आहेत, ज्यांनी १२ आमदारांचा निर्णय एक वर्षे घेतला नाही.
अभिषेक मनु सिंघवी – उपाध्यक्षांवरच नेहमी संशय का घेतला जातोय, राज्यपाल हे पवित्र गाय आहेत का
अभिषेक मनु सिंघवी – ते देवदूत नाहीत, मानव आहेत.
अभिषेक मनु सिंघवी – राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घ्यायला हवं होतं.
सॉलिसिटर जनरल- 39 आमदारांच्या जीवाला धोका होता असा मीडिया रिपोर्ट
सलिसिटर जनरल – संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला
सॉलिसिटर जनरल – या धमक्यांकडे राज्यपाल दुर्लक्ष करु शकत नव्हते.
सॉलिसिटर जनरल – नोटिशीला उत्तर देण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला, तेच आता २४ तासांत बहुमत चाचणी का, असा प्रश्न विचारत आहेत.
सॉलिसिटर जनरल – राज्यपालांनी आलेली सर्व पत्रे तपासली होती. त्यानंतर बहुमत चाचणीचा निर्णय घेण्यात आला.
सॉलिसिटर जनरल यांचा युक्तिवाद संपला
सॉलिसिटर जनरल – नबम राबिया यांच्या निकालाचा संदर्भ देण्यात आला.
सॉलिसिटर जनरल – राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यासारखे काही घडलेले नाही
सॉलिसिटर जनरल – राज्यपालांच्या आदेशाचं वाचन
सॉलिसिटर जनरल – राज्यपालांच्या आदेशाची कोर्ट समीक्षा करु शकते
राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचा युक्तिवाद
कोर्ट- सध्याची स्थिती अपरिवर्तनीय नाही-न्यायाधीश
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता – उपाध्यक्षांनी त्यांचा अधिकाराचा गैरवापर केला
सॉलिसिटर जनरल – अविश्वासाचा प्रस्ताव असताना निर्णयाचे धाडस केलेच कसे
सॉलिसिटर जनरल- अल्पमतात सरकार, उपाध्यक्षांच्या अधिकारांचा चुकीचा वापर
सॉलिसिटर जनरल – कोण मतदान करणार आणि कोण नाही, हे उपाध्यक्ष ठरवू शकत नाहीत
राज्यपालांचे वकील मणिंदर सिंह यांचा युक्तिवाद
मणिंदर सिंह- बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना कुणाच्याही सूचनेची गरज नाही.
मणिंदर सिंह – बहुमत चाचणी बोलावण्याचा राज्यपालांना अधिकार आहे.
मणिंदर सिंह- बहुमत चाचणीसाठी बोलावणं ही नैसर्गिक न्यायाची प्रक्रिया
मणिंदर सिंह – बहुमत चाचणी घ्या, बहुमत चाचणी सिद्ध करा
मणिंदर सिंह- बहुमत चाचणी रोखणे, हे न्यायाला धरुन नाही
नीरज कौल – राजकीय नैतिकतेसाठी बहुमत चाचणी गरजेची
कोर्ट- बंडखोर गटात किती आमदार आहेत
नीरज कौल – माहितीनुसार 55 पैकी 39 आमदार बंडखोर गटात आहे.
कोर्ट- किती जणांना अपात्रतेची नोटीस
नीरज कौल- 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस आहे.
नीरज कौल – शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही.
नीरज कौल- हा गटच शिवसेना आहे, यांच्याकडे बहुमत आहे. 9 अपक्ष आमदारांचेही समर्थन आहे.
नीरज कौल – पक्षातील केवळ 14 आमदार आम्हाला विरोध करीत आहेत.
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार नाहीत, त्यापूर्वी ते राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बहुमत चाचणीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल. ते निरोपाचं भाषण असेल, अशी माहिती आहे. तर मुख्यमंत्री शेवटच्या क्षणापर्यंत लढा देतील, असे राऊत म्हणाले आहेत.
मुंबई- माझ्याच माणसांनी मला दगा दिला, हे उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य हेलावून टाकणारे आहे. असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्यासारखा सस्कारक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. ते अजूनही मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जी वेदना व्यक्त केली, ती हेलावून टाकणारी आहे. हेच जेव्हा संजय राऊत बोलतात तेव्हा त्यांच्यावर गुवाहाटीतील आमदार टीका करतात. पण मी जे म्हणतो तेच मुख्यमंत्री वेगळ्या भाषेत म्हणत आहेत. ज्यांनी न पटणारी कारणे देत मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याची वेदना महाराष्ट्राच्या मनात कायम राहील. ज्या प्रमाणे औरंगजेब या मातीत गाडला गेला, त्याचप्रमाणे या बंडखोरांना हिशोब द्यावा लागेल. हे जे तुम्ही काही राष्ट्रीय हेतूने केलं की त्यामागे तुमचा काही स्वार्थ होता. हे प्रश्न निर्माण होतील, त्याची उत्तरे बंडखोरांना द्यावं लागेल. उद्धवजींचे भाषण निरोपाचं भाषण केलं नाही, त्यांची त्यांच्या भावना व्यक्त केल्या. उद्या जे व्हायचं ते होईल. राज्याने एक सुस्कंकृत नेतृत्व अनुभवलं, असं राऊत म्हणाले आहेत. आमचे काही मित्र मंत्रिपदासाठी कपडे शिवून तयार आहेत. त्यासाठी त्यांनी जे पाप केलं आहे शिवसेना फोडण्याचं. ते पाप महाराष्ट्र विसरणार नाही. त्यांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात सैन्य दाखल झालं आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठण्यात आल्या आहेत. काही जणांना अटक करण्यात आली आहे. मला तुरुंगात टाकण्यासाठी केंद्रीय यंत्रणा भाजपाच्या मदतीने प्रयत्न करीत आहेत.
नीरज कौल – राज्यपालांविरोधात केलेला सिंघवींचा युक्तिवाद चुकीचा
नीरज कौल – राज्यपालांनी अपक्षांच्या पत्राचाही विचार केला आहे.
नीरज कौल – उपाध्यक्षांना कोणत्याही निर्णयांचा अधिकार नाही, त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आहे.
मुंबई- सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनाम्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. उद्याच जर बहुमत चाचणीचा निर्णय झाला, तर मुख्यमंत्री राजीनमा देण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. कॅबिनेट बैठकीत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. आजच्या बैठकीत तीन नामांतरांचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नीरज कौल- स्पष्टता येण्यासाठी आणि सभागृहाचं बहुमत पाहण्यासाठी विश्वासमत चाचणी गरजेची
नीरज कौल – या स्थितीत बहुमत चाचणी गरजेची. ती घेण्याचे राज्यपालांनी ठरवले आहे.
नीरज कौल – तुमच्याकडे बहुमत असेल तर जिंकाल नसेल तर हराल
नीरज कौल – माध्यमांमधून मिळणारी माहिती महत्वाची
नीरज कौल- राज्यपालांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर संवैधानिक कर्तव्य बजावले
नीरज कौल- राज्यात 2020 मध्ये बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला होता.
नीरज कौल- बहुमत चाचणी तत्काळ व्हायलाच हवी
नीरज कौल – आधी बहुमत चाचणी आधी घ्या, मग बाकीचे निर्णय घ्या
नीरज कौल – अविश्वास प्रस्ताव असलेले उपाध्यक्ष नोटीस कशी देऊ शकतात
नीरज कौल- लोकशाहीत बहुमत चाचणीसाठी विधिमंडळापेक्षा दुसरी जागा आहे का?
नीरज कौल – बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्ष कोर्टात येतात, इथे मात्र दुसरीच परिस्थिती आहे.
नीरज कौल- कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं असताना बहुमत चाचणीला विरोध का
नीरज कौल- राज्यपालांनी घेतले निकाल हा योग्य आहे. सध्याची स्थिती पाहता तो योग्यच म्हणायला हवा
नीरज कौल- चाचणीला उशीर केल्यास घटनेला अधिक धक्का बसेल
मुंबई – तीन वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यांनी चांगले सरकार चालवले. त्यांनी आणि सचिवांनी केलेल्या कामाबद्दल आभार मानले. सध्याच्या परिस्थितीत विश्वासदर्शक ठराव उद्या होणार आहे. त्यांच्याच पक्षातील आमदारांना उद्या उपस्थित राहता येणार की नाही, याचीच त्यांना शंका असावी. कोर्टाने निर्णय दिल्यास बहुमत चाचणी होईल. उद्या चाचणी झाली तर ही शेवटची कॅबिनेट बैठक असेल. अडीच वर्ष खूप सहकार्य केले, काही चूक झाली असेल तर माफ करा, असेही मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती आहे.
कोर्ट – बहुमत चाचणीत कोण कोण येऊ शकेल?
नीरज कौल – अल्पमतातील सरकार सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतंय. मुख्यमंत्री बहुमत चाचणीपासून वाचण्याचा प्रयत्न का करतायेत.
मुंबई- मला माझ्याच काहीच लकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उद्भवली, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पाच वर्षे हे सरकार चालणार असे मी म्हणालो होतो, पण माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई- औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर होणार, उस्मानाबादचं नामकरण धाराशीव होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून हे प्रस्ताव मांडण्यात आले होते. तर नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. या तीन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दि बा पाटील यांच्या नावाची मागणी काँग्रेसकडूनही करण्यात आली होती.
नवी दिल्ली – एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांची युक्तिवादाला सुरुवात
नीरज कौल – नबम रेबिया यांच्या निकालाचा दाखला दिला. उपाध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय व्हायला हवा. मात्र सद्यस्थितीत बहुमत चाचणी लांबवू नये. घोडेबाजार होऊ नये, म्हणून ही चाचणी महत्त्वाची आहे. अनेकांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल. सदस्यांची अपात्रता हा मुद्दा नाही. बहुमत चाचणी ही लोकशाही मजबूत करणारी बाब, असे सुप्रीम कोर्टानेच सांगितलेले आहे.
नीरज कौल – अपात्रता हा मुद्दा गैरलागू ठरतो. बहुमत चाचणी व्हायलाच हवी. विश्वासदर्शक ठराव थांबवता येणार नाही.
नीरज कौल- सरकारचं बहुमत सोडा, शिवसेना पक्षातच बहुमत नाही
नीरज कौल – हे बहुमत चाचणीला का घाबरत आहेत.
अभिषेक मनु सिंघवी – सिंघवींनी मध्य प्रदेशातील 2020 च्या प्रकरणाचा दावा केला. कृत्रिम बहुमत निर्माण करुन त्यानंतर सरकार स्थापन करण्यात आले होते. हे टाळण्यासाठी 11 जुलैनंतर बहुमत चाचणी व्हावी. मध्य प्रदेशात याबाबत अध्यक्षांना अधिकार होता, मात्र महाराष्ट्रात उपाध्यक्षांना तो अधिकार का नसेल. सदस्यत्वांबाबत निर्णयाचा अधिकार उपाध्यक्षांना का नाही
अभिशेक मनु सिंघवी – सुनील प्रभू हेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद आहेत, त्यांना उपाध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे.
कोर्ट – अयोग्यतेचा मुद्दा असला तरी बहुमत चाचणी थांबवता येणार नाही.
अभिषेक मनु सिंघवी- उत्तराखंच्या रावत केसचा दाखला देत बहुमतचाचणीसाठी हा कमी वेळ असल्याचा युक्तिवाद. यापूर्वीच्या प्रकरणांत आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेला नव्हता. आधी आमदारांच्या सदस्यत्वाचा मुद्दा निकाली लागणे गरजेचे आहे. १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय़ होईपर्यंत विश्वासमत चाचणी नको.
पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करा अशी मागणी काँग्रेसने मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे. आजची बैठक ही नामांतरासाठी गाजण्याची शक्यता आहे. शिवसेना औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची काँग्रेसची मागणी आहे. शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोडला बॅरिस्टर अंतुलेंचं नाव देण्याची मागणी
अभिषेक मनु सिंघवी – राज्यपालांनी कोरोनामुक्त झाल्यावर लगेच ते विरोधी पक्षनेत्यांना भेटले आणि त्यांनी लगेचच बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत, याची एवढी घाई का ? ज्यांनी बाजू बदलली ते जनतेची भूमिका मांडू शकणार नाहीत. 11 जुलैपर्यंत राज्यपाल वाट पाहू शकत नाहीत का, ही कायदा आणि घटनेची थट्टा नाही का?
कोर्ट – राज्यपालांनी विरोधी पक्षाचं सरकार व्हावं, असं लिहिलं आहे का ?
अभिषेक मनुसिंघवी- किहोटो निकालाचं सिंघवींकडून पुन्हा वाचन. सत्ता लोभी लोकांपासून लोकशाहीला वाचवणे, हा या निकालाया पाया आहे.
कोर्ट – शिंदे गटाने खरेच सत्ता स्थापन करण्याचे पत्र पाठवले आहे का ? बहुमताचा निर्णय विधानभवनातच शक्य आहे.
अभिषेकमनु सिंघवी- मुख्यमंत्र्यांना न विचारता बहुमत चाचणीचे आदेश का, शिंदे गटासाठी एवढी घाई का ?
अभिषेक मनु सिंघवी- बंडखोरांनी स्टे मिळवला म्हणजे त्यांना वाटते की ते काहीही करु शकता
कोर्ट- 34 लोकांनी सह्या केल्या नाहीयेत का
अभिषेक मनुसिंघवी- त्याची शहानिशा झालेली नाही. विरोधी पक्षनेते भेटल्यानंतरच राज्यपालांनी विश्वसमत चाचणीचे आदेश दिलेत. उपाध्यक्षांच्या निर्णयापूर्वी बहुमत चाचणी नको.
कोर्ट- जर सरकारने बहुमत गमावलेले असेल, आणि सरकारकडून उपाध्यक्षां वापर केला असेल असे गृहित धरले, हे जर राज्यपालांना कळले असेल तर राज्यपाल काय करणार?
अभिषेक मनुसिंघवी – राज्यपालांनी शिंदे गटाचं पत्र का तपासलं नाही. अनधिकृत मेल आयडीवरुन पत्र पाठवून आमदार सूरतवरुन गुवाहटीला गेले.
मुंबई- वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख मंत्रिमंडळ बैठक सोडून निघाले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत असे काय घडले ज्यावरुन हे मंत्री बाहेर पडले आहेत. अशी चर्चा सुरु झाली आहे. नामांतराचे प्रस्ताव मांडण्यात आल्याने काँग्रेस नाराज झाली आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.
नवी दिल्ली – विश्वासदर्शक ठरावाला दिलेल्या आव्हानावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. शिवसेनेकडून अभिषेक मनुसिंघवी, शिंदेंकडून नीरज कौल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपालांच्या बाजूने भूमिका मांडणार आहेत.
अभिषेक मुन सिंघवी- आपल्याला सात ते आठ मुद्दे मांडायचे आहेत. आजच बहुमत चाचणीचे पत्र मिळाले आहे. खूप वेगाने चाचणी होते आहे. बहुमत चाचणीला सर्व आमदार उपस्थित हवेत, तेव्हाच ती खरी ठरेल. काही आमदार कोरोनाग्रस्त आहेत, तर काही परदेशात असल्याचा युक्तिवाद.
अभिषेक मनु सिंघवी- मतदानासाठी कोण पात्र आणि कोण अपात्र हे आधी ठरायला हवे ? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका अद्याप प्रलंबित आहे. तसेच शिवसेनेच्या 16 बंडखोरांबाबतचा निर्णयही 11 तारखेला प्रलंबित आहे. 11 जुलैनंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावे.
कोर्ट- बहुमत चाचणीसाठी कमी वेळ आहे का ?
अभिषेक मनुसिंघवी- हो, हा वेळ कमी आहे.
कोर्ट- बहुमत चाचणी आणि अपात्रतेचा संबंध काय ?
अभिषेक मनुसिंघवी – यांचा एकमेकांशी संबंध आहे. बहुमत चाचणी आणि अपत्रातेचा एकमेकांशी संबंध आहे. ते जर अपात्र झाले तर ते आमदार राहणार नाहीत. अपात्र झाल्यावर त्यांचं मत अवैध ठरेल.
कोर्ट- ते अपात्र आहेत की नाहीत हे कोर्ट ठरवणार आहेत, याबाबत उपाध्यक्षांवर प्रश्न निर्माण झालेले आहेत. कोर्ट अपवादात्मक परिस्थितीतच आदेश देऊ शकतात. राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही.
अभिषेक मनुसिंघवी – राजेंद्र सिंह राणा यांच्या खटल्याचा दाखला देण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने काम करायला हवे, विरोधी पक्षनेत्यांच्या आदेशानुसार वागू नये. जर उद्या विधानसभा उपाध्यक्षांनी या आमदारांबाबत निर्णय घेतला तर त्यामुळे लोकशाहीच्या मूळची धोकात येतील. ही भीती त्याच दिवशी व्यक्त करण्यात आली होती. मात्र तुम्ही त्यावेळी कोर्टात पुन्हा येऊ शकाल असे सांगितले होते. त्यानुसार आम्ही आलो आहोत. सिंघवींनी 34 बंडखोर आमदारांचे पत्र वाचून दाखवले.
गुवाहाटी- गेल्या सात दिवसांपासून गुवाहाटीत असलेल्या शिवसेना बंडखोर आमदारांचा मुक्काम आता संपला आहे. आता हे आमदार बसमधून विमानतळावर बसमधून पोहचले आहेत. भाजपा नेते मोहित कम्बोज हेही यात दिसले आहेत. गुवाहाटी विमानतळावरुन ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यात त्यांचा मुक्काम ताज हॉटेलमध्ये असणार आहे. हा प्रवास सरकार स्थापनेच्या दिशेने आहे, अशी चर्चा रंगली आहे.
मुंबई- मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे हेही त्यांच्यासोबत आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी अनिल परब यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती आहे. आजच्या बैठकीत तीन नामांतरांच्या मुद्द्यावर खडाजंगी होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरांचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. या नामांतरांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या नामांतरांच्या मागणीला विरोध झाला तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. तर मंत्रालयातही सचिवालयात तयारी करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक अजित पवार यांच्या दालनात झाल्याची माहिती आहे. मंत्रालयात पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करुन ते मंत्रालयात आत गेले आहेत.
नवी दिल्ली – राज्यपालांनी दिलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या आदेशाला शिवसेनेने आव्हान दिले आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. आज सकाळी ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्यावर संध्याकाळी 5 वाजता सुनावणी करणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात शिवसेनेने दोन आक्षेप घेतले आहेत. यात पहिल्यात असा युक्तिवाद केला आहे की, अधिवेशन बोलवण्याचा राज्यपालांचा आदेश मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या शिफारसी आणि सल्ल्याने जारी करण्यात येण्याची गरज होती, मात्र राज्यपालांनी त्याच उल्लंघन करून मनमानी पद्धतीने अधिवेशन बोलविण्याचे आदेश जारी केला आहे. शिवसेनेचा दुसरा असा आक्षेप घेतला आहे की, पक्षांतराचा आरोप असलेल्या काही आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वी त्यांना विधानसभेच्या कामकाजाचा भाग बनवणे हे संविधान विरोधी आहे. हे शिवसेनेचे आक्षेप आहेत.
मुंबई- भारतीय जनता पार्टीचे नेते काल राज्यपालांना भेटले आणि महाविकास आघाडी सरकारवर अविश्वास ठराव आणा अशी मागणी केली, राज्यपालांनीही तात्काळ उद्या अधिवेशन बोलवण्याचे सूचना सरकारला केली. मात्र राज्यपालांनी एवढीच तत्परता दोन वर्षांपासून रखडलेल्या 12 आमदारांच्या शिफारसीबाबत का दाखवली नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे यादी दिली होती, ती आमदारांची यादी तत्परतेने मंजूर केली असती तर राज्यपालांचा आदर वाढला असता, असे खडसे म्हणाले आहेत. राज्यपालांनी अधिवेशन बोलण्यासाठी काही अवधी द्यायला हवा होता, असेही खडसे म्हणालेत. कोणी भेटायचं आणि अविश्वास ठराव राज्यपालांकडे मागणी करायची, कधी अधिवेशन बोलवायचं, याचे काही प्रक्रिया-नियम असतात, असेही ते म्हणाले. तत्काळ अधिवेशन बोलवणे हे कृत्य घटनाबाह्य आहे अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच पुढच्या कालखंडातही राज्यपालांनी अशीच तत्परता दाखवावी, असेही खडसे म्हणालेत.
गुवाहाटी- गेल्या सात दिवसांपासून गुवाहाटीत असलेल्या शिवसेना बंडखोर आमदारांचा मुक्काम आता संपला आहे. आता हे आमदार बसमधून विमानतळाकडे निघाले आहेत. गुवाहाटी विमानतळावरुन ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यात त्यांचा मुक्काम ताज हॉटेलमध्ये असणार आहे. हा प्रवास सरकार स्थापनेच्या दिशेने आहे, अशी चर्चा रंगली आहे. गेले सात दिवस सूरत ते गुवाहाटी असे राजकीय नाट्य सुरु होते. शिवसेनेचे सुमारे 39 आमदार आणि 11 अपक्ष आमदार यांचा यात समावेश आहे.
मुंबई- मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत. आदित्य ठाकरे हेही त्यांच्यासोबत आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी अनिल परब यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती आहे. आजच्या बैठकीत तीन नामांतरांच्या मुद्द्यावर खडाजंगी होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरांचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. या नामांतरांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या नामांतरांच्या मागणीला विरोध झाला तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई- मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांच्या हक्काचे 52 आमदार सोडले मात्र ते पवारांना सोडायला तयार नाहीत, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. आज शिवसेनेवर जे संकट आहे त्याला कारण शिवसेनाच आहे, असेही विखे म्हणाले. हे सरकार अल्पमतात आहे त्यामुळे राज्याला स्थिर सरकार मिळावे यासाठी चाचपणीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्याचा निकाल काही असो मात्र राष्ट्रवादीसोबत राहून शिवसेनेचे खच्चीकरण झाले, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. अजूनही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहनही विखे पाटील यांनी केले आहे. जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत त्यांनी आपले रक्त सांडून शिवसेना उभी केली आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे माझी विनंती आहे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा नाद सोडावा आणि 45 आमदार म्हणतील तसं करावं अशी ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थनाच सुजय विखे यांनी केली आहे.
गुवाहाटी- एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गुवाहाटीचा मुक्काम संपवून आज गोव्याकडे निघणार आहेत. गुवाहाटीतील रेडिसन्स ब्ल्यू या हॉटेलात आमदारांनी त्यांच्या बॅगा भरल्या असून, त्यांची निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हॉटेलमधून कार्यकर्ते आणि स्वीय सहायकांची गाडी विमानतळाकडे निघाली आहे, दुसऱ्या गाडीतून आमदार विमानतळाकडे रवाना होणार आहेत. यातली पहिली गाडी निघाली आहे. हे आमादर आज रात्रीचा मुक्काम गोव्याच्या ताज हॉटेलमध्ये करणार आहेत. गुवाहाटी आणि गोवा विमानतळावर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. बंडखोर आमदारांचा नव्या सरकारच्या दिशेने प्रवास सुरु असल्याचे मानण्यात येते आहे.
गुवाहाटी- एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गुवाहाटीचा मुक्काम संपवून आज गोव्याकडे निघणार आहेत. गुवाहाटीतील रेडिसन्स ब्ल्यू या हॉटेलात आमदारांनी त्यांच्या बॅगा भरल्या असून, त्यांची निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हे आमादर आज रात्रीचा मुक्काम गोव्याच्या ताज हॉटेलमध्ये करणार आहेत. गुवाहाटी आणि गोवा विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यात चर्चा होते आहे. अनिल परब मातोश्रीवर पोहचले आहेत. आज जर राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली, तर त्यात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. संध्याकाळी उशिरा ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला तर त्यावेळी पाहू असे उत्तरही अनिल परब यांनी दिले आहे. मातोश्रीवर जाण्यापूर्वी त्यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. जयंत पाटील आणि हेमंत टकले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. संध्याकाळी 5 वाजता राज्य मंत्रीमंडळाची बैठक आहे. त्यात औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराची मागणी शिवसेना करणार आहे, त्यावर काय निर्णय होईल, यावर चर्चा सुरु असल्याची शक्यता आहे. या बैठकीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोना असतानाही आढावा घेतल्याची माहिती आहे. आज शिवसेना औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करा असा प्रस्ताव मांडण्याच येणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी अजित पवारांकडून आढावा घेतला असल्याची माहिती आहे.
गुवाहाटी- गुवाहाटीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बैठकीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात आमदार शहाजीबापू यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यात शरद पवारांनी वसंतराव पाटील यांनी कसे बंड केले होते, हे सांगितले आहे. शरद पवारांना ज्यांनी जवळ केलं त्यांना पवारांनी दगा दिला, त्यामुळं पवारांच्या नादी लागू नका, असं शहाजीबापू म्हणाले आहेत.
शहाजीबापू यांचे पूर्ण संभाषण- वसंतदादा पाटील हे माझे वडील आहेत, त्यांच्या आशिर्वादाने मी आज मोठा झालेलो आहे. आणि मी वसंतदादा पाटलांना कधीही दगा देणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते. मात्र दीड वाजता तिथंच बातमी आली. की शरद पवारनं बंड केलं, 40 आमदार घेऊन पळून गेलं, वसंतदादांनी राजीनामा दिला. माझा तर अनुभव लय जोरात आहे. भेटलो की, कसं चाललंय तुझं, बरं चाललंय? काय म्हणतो, गणपतराव…मी तुम्हाला भेटायलोय, ते गणपतराव कशाला काढताय…? हे असंच कायतरी बोलायलंय..हे फसवणारं गुळगुळ आहे…ज्या ज्या माणसाला शरद पवारानं जवळ घेतलं, त्या त्या माणसाला काखेत दाबून मारुन टाकलं…बघा, वसंतदादा पाटलानं आमराईला सभा घेतली, महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवून सांगितलं, इथून पुढं शरद पवारसोबत रहावा…कुठंय वसंतदादाचं घर, कुठंय श्रीपतराव गोंधळ्याचं घर, कुठंय प्रतापराव भोसल्याचं घर, कुठंय कल्लपाचं घर, कुठंय नामदेवराव जगतापाचं सोलापुरातलं घरं…विलासराव आणि सुशीलकुमार शिंदे, हुशार म्हणून पळून गेली. नायतर ह्यांनापण चुरा करुन टाकला असता. असलंय, आपण लांबय, चांगलंय…त्यांच्या नादाला साहेब लागू नका, बाकी काय बी निर्णय घ्या, त्याला जवळ करायचं नाय, नायतर मेलो आपण…
मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर काही व्हिडिओ तुफान व्हायरल केले जात आहेत. या व्हिडीओंमध्ये एकनाथ शिंदे हे खरे हिंदुत्ववादी नेते आहेत असा संदेश दिला जातोय, दुसरीकडे शिंदे हे शिवसेनेतच राहणार हा देखील संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहे. खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्नही या व्हिडिओंच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबई- आजची मंत्रिमंडळ बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. तीन नामांतरांसाठी शिवसेना आग्रही असणार आहे. यात औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा, उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करा आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही असणार आहे. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, यावर सरकारचे भवितव्य ठरणार असल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात शिवसेनेने दोन आक्षेप घेतले आहेत. यात पहिल्यात असा युक्तिवाद केला आहे की, अधिवेशन बोलवण्याचा राज्यपालांचा आदेश मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या शिफारसी आणि सल्ल्याने जारी करण्यात येण्याची गरज होती, मात्र राज्यपालांनी त्याच उल्लंघन करून मनमानी पद्धतीने अधिवेशन बोलविण्याचे आदेश जारी केला आहे. शिवसेनेचा दुसरा असा आक्षेप घेतला आहे की, पक्षांतराचा आरोप असलेल्या काही आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वी त्यांना विधानसभेच्या कामकाजाचा भाग बनवणे हे संविधान विरोधी आहे. हे शिवसेनेचे आक्षेप आहेत.
पुणे – शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत राहून शिवसेनेचं नुकसान होतं आहे. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, तीच आपली भूमिका आहे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनी याबाबत शिवसेना नेतृत्वाकडे वारंवार विनंती केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे शिवतारे म्हणाले आहेत. शिवसेना वाचवणे हीच एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे. मागच्या निवडणुकीत 52 मतदारसंघ असे होते की ज्या ठिकाणी शिवसेना नंबर दोनवर होती, असेही शिवतारे यांनी सांगितले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आम्ही संघर्ष केला असेही शिवतारे म्हणाले. उद्धव ठाकरेंना एक ठराव करुन पाठवत आहोत, त्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नसल्याचे म्हटले असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे.
शिवसेनेवर टीका करणारे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. राजीनाम्याची स्क्रीप्ट ठरली आहे. संभाजी नगरच्या नामांतरणाचा आव आणायचा आणि आपले हिरवे प्रेम खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे. कुठे आणून ठेवलीये मा. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना? असे ट्विट त्यांनी केले आहे.
राजीनाम्याची ‘ स्क्रीप्ट ‘ठरली. संभाजी नगरच्या नामांतराचा ‘आव आणायचा आणि आपले ‘हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे.. कुठे आणून ठेवलीये मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना??
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2022
दिल्लीत कायदेशीर प्रक्रिया सुरु असताना आता भाजपनेही याची तयारी सुरु केली आहे. राज्यातील भाजपाचे नेते राहुल नार्वेकर यांच्यासोबतचे भाजपाच्या वकिलांची टीम दिल्लीला रवाना झाली आहे. कालही जेव्हा जे पी नड्डा यांची फडणवीस यांनी भेट घेतली होती तेव्हा महेश जेठमलानी हे त्यांच्यासोबत होते.
एकनाथ शिंदे यांना मर्थन करण्यासाठी ठाण्यात एकीकडे शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने एकनाथ शिंदे यांना थेट बाहुबली अशी पदवी देत बाहुबलीच्या स्वरूपात त्यांचे मोठे बॅनर उभारले आहे. या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे बाहुबली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.एकनाथ शिंदे यांचे बाहुबली स्वरूपात उभारण्यात आलेले हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. हा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या निवस्थानाच्या बाहेरच लावण्यात आला आहे. यासंदर्भात दक्षिण भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचे सांगितले आहे .मात्र या बॅनरच्या माध्यमातून विजयी भवं असा संदेश देखील देण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दक्षिण भारतीयांचा देखील पाठिंबा यानिमित्ताने जाहीर कारण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे
गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाताहत झाली, असे सांगत राज्याचे नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावं. असं साकडं गोपीचंद पडळकर यांनि सिद्धिविनायकाला घातलं आहे. यावेळी आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली आहे.राज्यातील बहुजन समाज,सामान्य जनता,व्यापारी,शेतकरी या भ्रष्टाचाराच्या वणव्यात होरपळून निघाले आहेत, असे पडळकर म्हणाले.
अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्यानं ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. मात्र या सत्तासंघर्षात तेही घरातून सक्रिय असल्याची माहिती आहे. घरी बसून अजित पवार सूत्रं हलवतायेत, अशी माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला अजित पवार फोन करतायेत. फोनवरून अजित पवार आमदारांना सूचना देत असल्याचे सांगण्यात येते आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईत दाखल व्हायला सुरुवात
आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही स्वखुशीने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत. आता लवकरच मुंबई मध्ये येत आहोत. असे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. मतदारसंघातील सर्व नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहणार आहोत, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन
बहुमतासाठी मदत करण्याचं आवाहन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरेंना फोन
राजू पाटील यांचं मतासाठी फोन
शिवसेनेची कोर्टात धाव
बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका
संध्याकाळी पाच वाजता सुनावणी
तीन वाजेपर्यंत सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश
मातोश्रीवर शिवसेनेचे नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत
सागर बंगल्यावर देखील भाजपची बैठक बोलावण्यात आलीय
सत्तासंघर्ष सुरू असताना घडामोडींना वेग आलाय
शिंदे गटातील आमदार उद्या मुंबईत
तीन वाजता गोव्यात बंडखोर आमदार दाखल होतील
त्यानंतर उद्या आमदार मुंबईत येतील
सत्तासंघर्ष सुरु असताना भाजपची बैठक
महत्वाचे नेते सागर बंगल्यावर दाखल
बैठकीत काय होणार याकडे लक्ष
‘मातोश्री’वर आमदारांची बैठक सुरू
शिवसेना नेते संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती
आज बुधवारी दुपारी 3.30 वाजता गुवाहटीतून एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार गोव्याकडे रवाना होतील
बुधवारी संध्याकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान बंडखोर आमदार गोव्यात उतरतील. बुधवारचा गोव्यातील मुक्काम हा ताज हॉटेलमध्ये असेल
गुरुवारी सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास गोव्याहून सर्व आमदार मुंबईच्या दिशेने विमानाने निघतील
गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावरून सर्व आमदार हॉटेल ताज येथे जातील
मुंबईतील हॉटेल ताजमध्येच भाजपच्या सर्व आमदारांना बोलावून घेण्यात आलं आहे
मुंबईतल्या हॉटेल ताजमध्येच भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार एकत्र नाश्ता करतील
बहुमत चाचणी सकाळी 11 वाजता आहे. त्याआधी भाजप आणि शिंदेसेना विधानभनाकडे रवाना होईल
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नाव अजून पुढे दिली नाही
त्या राज्यपाल यांनी बहुमत चाचणीचा घाईघाईने निर्णय घेतला
कायदा घटना पायदळी तुडवली जातेय
आम्ही नोटीस ला उत्तर देण्यासाठी, न्यायालयात गेलो आहोत
सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलै पर्यंत मुदत दिली आहे
अपात्र सदस्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही,
आधीच कसे अधिवेशन बोलावतात
अरविंद सावंत यांचा सवाल