मुंबई : आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मोठी सुनावणी पार पडली आणि अजूनही शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांचं काय होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. मात्र या सुनावणीनंतर आता नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूचक विधान केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले. तसेच अरुणाचल प्रदेश सरकारसारखा निकाल महाराष्ट्राच्या बाबतीत ही लागू शकतो, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत, त्यामुळे पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर सुप्रीम कोर्टाने 27 जुलैपर्यंत कागदपत्र सादर करायला तसेच 1 ऑगस्टला या प्रकरणी पुढील सुनावणी ठेवली आहे. ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची सुनावणी ठरणार आहे.
यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, कपिल सिबल यांनी शिवसेनेच्या वतीने जो युक्तिवाद केला त्याला घटनेच्या दहाव्या शेड्युलचा आधार आहे. दुसऱ्या बाजूने जो युक्तिवाद झाला त्याला जनरल कॉमन सेन्सचा आधार आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय घेईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधी जाण्याची जी कृती होती ती कायदेशीर होती, हे जे कपिल शीब्बल यांचं आर्ग्युमेंट आहे, ते जास्त योग्य होतं आणि आम्हाला विश्वास आहे, यात योग्य निवाडा होईल असेही जयंत पाटील म्हणालेत.
#UPDATE | Supreme Court posts for hearing on August 1 the pleas relating to #MaharashtraPoliticalCrisis & grants time to Maharashtra CM Eknath Shinde-led camp to file an affidavit on the pleas filed by Shiv Sena chief Uddhav Thackeray-led faction.
— ANI (@ANI) July 20, 2022
युक्तिवाद करताना त्यांना कोर्टाचा दृष्टिकोन लक्षात आला, त्यावर त्यांचा युक्तिवाद जो तयार केला होता त्यापेक्षा वेगळा युक्तिवाद करण्याची गरज भासली, त्यामुळे त्यांनी वेळ मागितला असावा, त्यामुळे कोर्टाने दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्रं सादर करायला सांगितली आहेत. मला अपेक्षा आहे, आठ दिवसानंतर प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर निर्णय तर होईलच, मात्र मला अभिमान आहे की हा जो सरकार पाडण्याचा अनागोंदी प्रकार झाला आहे, त्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे, त्यात कोर्ट तातडीने तारखा देत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.