मुंबईः सत्तांतरानंतर मुंबई आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. पक्षांतर्गत बंडाळीनंतर शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याचे दोन भाग झालेत. एका गटाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संबोधित करतील तर दुसऱ्या गटाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मार्गदर्शन करतील. एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यासाठी बीकेसी ग्राउंडवर तयारी करण्यात आली आहे. तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाची तयारी पूर्ण झाली आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी बीकेसी परिसरात भव्य स्टेज उभारण्यात आलंय. जवळपास २ लाख लोक या सभेसाठी येतील, असा अंदाज आहे. तर शिंदे गटाने ३ लाख लोकांचं टार्गेट दिलंय.
गर्व से कहो हम हिंदू है… या आशयाचं मोठं बॅनर शिंदे गटाच्या स्टेजवर लावण्यात आलंय. शिंदे गटाच्या मेळाव्यात एक भव्य लेझर शो आयोजित करण्यात आलाय.
कबूतराची नाही … गरूडाची भरारी घ्या, या बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचं बॅनरही येथे लावण्यात आलंय…
तर दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याची तयारी झाली आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला एकनिष्ठ दसरा मेळावा… अशी टॅगलाइन देण्यात आली आहे.
वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या! ? https://t.co/KyQWJVymZG
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 30, 2022
28 एकरचा संपूर्ण शिवाजी पार्क भरला जाईल, असा दावा शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. राज्यभरातून शिवसैनिक या ठिकाणी येऊ लागलेत.
नवी आशा, नवी पहाट
जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार, भेदभाव सोनं लुटुया हिंदुत्वाच्या विचारांचं….
करुनी सीमोल्लंघन साधूयात लक्ष महाराष्ट्राच्या विकासाचं….#दसरा आणि #विजयादशमी च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा….#Dussehra #Shivsena #Dussehra2022 pic.twitter.com/ovZ9iIjayg— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 5, 2022