Maharashtra Government : सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय, आम्हीच शिवसेना’, शिंदे गटाचं ठरलं?

| Updated on: Jun 23, 2022 | 11:02 AM

महाविकास आघाडी सरकराचा पाठिंबाही काढून घेणार असल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात शिंदे गटाची बैठक होणार आहे. यात हा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra Government : सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय, आम्हीच शिवसेना, शिंदे गटाचं ठरलं?
Follow us on

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी! शिंदेगट मविआ सरकारचा (Mahavikas Aghadi Government)  पाठिंबा काढण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. शिंदेगट उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अधिक सक्रीय झाल्याचं दिसतंय. आता महाविकास आघाडी सरकराचा पाठिंबाही काढून घेणार असल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात शिंदे गटाची (Eknath Shinde) बैठक होणार आहे. यात हा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

शिंदेगट मविआचा पाठिंबा काढणार

शिंदेगट उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अधिक सक्रीय झाल्याचं दिसतंय. आता महाविकास आघाडी सरकराचा पाठिंबाही काढून घेणार असल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात शिंदे गटाची बैठक होणार आहे. यात हा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याशी बोलताना थोड्यावेळात होणाऱ्या बैठकीत हा निर्णय होणार आहे, असं सांगितलं. या बैठकीत कुठलाही आदेश नसेल तर सगळ्यांची मतं जाणून घेत निर्णय होईल, असंही बच्चू कडू म्हणालेत.

भाजपसोबत जाण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. उद्धव ठाकरेंनी तर थेट एकनाथ शिंदेंनी सांगावं मी योग्य राज्य कारभार करत नाही मी आता राजीनामा देतो, असं म्हटलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. 4 अटी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्या आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यामातून ठेवल्या आहेत.

  1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
  2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
  3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
  4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे

 

सत्तेचं गणित कसं असेल?

बंडानंतर एकनाथ शिंदे गट मजबूत!

एकनाथ शिंदे – 47
भाजप – 106
अपक्ष – 13
एकूण – 166

बंडानंतरची महाविकास आघाडीची अवस्था

शिवसेना – 14
राष्ट्रवादी – 53
काँग्रेस – 44
अपक्ष – 10
एकूण – 121