मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचं सरकार येणार हे नक्की होतं. त्यानुसार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जात राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. काही वेळातच एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे शिंदे यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणार की नाही? असा प्रश्न आता विचारला जातोय.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाहता सगळे हेवेदावे आणि वाद विसरून सर्वच राजकीय पक्षाचे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतात असा इतिहास आहे. 2019 ला उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यावेळी शपथविधी सोहळ्याला उपस्थिती होती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केलेली असली तर ते आपण आजही शिवसैनिक आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आपल्या मनात आदर असल्याचंच सांगत आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेतील एखादा मोठा नेता उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार होतं.
शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष आमदार एकत्रं आले आहेत. अजून काही लोक येत आहेत. या सर्वांचं पत्रं आम्हाी राज्यपालांना दिलं. आण्ही सत्तेच्या पाठिमाग नाही. मुखय्मंत्रीपदासाठी आण्ही चालत नाही.ही तत्तवाची लढाई. हिंदुत्वाची लढाई आहे. विचाराची लढाई. शिंदेंना भाजप पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एकट्याचाच शपथ विधी होईल. नंतर आम्ही विस्तार करू. त्यात शिवसेनेचे शिंदेंसोबत असलेलेल भाजपचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील.
मी बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार. काम करेल, असं फडणवीस यांनी जाहीर केलंय.