मुंबई : शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेना (Shiv sena) दोघांकडूनही धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. आता याबाबत निवडणूक आयोग (Election Commission) निकाल देणार आहे. धनुष्यबाणावर कोणाचा हक्क याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. धनुष्यबाण या चिन्हावरील आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी कागदपत्र, प्रतिज्ञापत्र सादर करण्याकरता शिवसेनेला आजची डेडलाईन देण्यात आली आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत पुरावे सादर करा असे आदेश निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेनेला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता काय होणार?, धनुष्यबाण कोणाला मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. आता याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. त्यासाठी आज दुपारी दोनपर्यंत पुरावे सादर करा असे आदेश निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेनेला देण्यात आले आहेत.
मात्र दुसरीकडे शिवसेना पुरावे सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागण्याच्या तयारीत आहे. शिवसेना आयोगाला पत्र लिहून वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे. आजचीच डेडलाईन का? असा सवाल शिवसेनेच्या वकिलांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केला आहे.
शिंदे गटाच्या नेत्यांकडून आमच्याकडे बहूमत आहे. त्यामुळे धनुष्यबाण आमचाच असा दावा केला जात आहे. शिंदे गटाकडे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य एवढेच नव्हे तर सरपंचांचे देखील बहुमत आहे. त्यामुले धनुष्यबाण हे चिन्ह आमचेच असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.