मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, आज अर्थात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील पार पडत आहे. महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत, तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार आहे.
कुठल्या मतदारसंघात किती उमेदवार रिंगणात?
या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. या व्यतिरिक्त बुलढाणा 12, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
या टप्प्यात 15 पेक्षा जास्त उमेदवार असलेले 4 मतदारसंघ आहे. यापैकी बीड मतदार संघात एका कंट्रोल युनिटमागे 3 बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदार संघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर अन्य 6 मतदार संघात प्रत्येकी 1 बॅलेट युनिट लागणार आहेत. या निवडणुकीसाठी 62 हजार 700 ईव्हीएम (37 हजार 850 बॅलेट युनिट आणि 24 हजार 850 कंट्रोल युनिट) तर सुमारे 27 हजार व्हीव्हीपॅट यंत्रे दिली आहेत.
दुसऱ्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ :
मतदारांना मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. मात्र, निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.
मतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज
मतदानासाठी मतदान ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी इतर अकरा प्रकारे ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.