ARMC Election 2022 Ward No 19 | अमरावतीत (Amravati) हा पश्चिम विदर्भातील राजकीयदृष्ट्या महत्वाचा जिल्हा आहे. ‘झाड झडुले शस्त्र बनेंगे ,भक्त बनेगी सेना ,पत्थर सबही बॉम्ब बनेंगे’ असे स्फुलिंग चेतवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या या पुण्यभूमीत भाजपने गेल्या महापालिका निवडणुकीत (Municipal Election) जम बसवला. 2012 साली अवघ्या 5-7 नगरसेवकांवर असलेल्या भाजपने (BJP) त्यानंतर संघटनात्मक पातळीवर पक्ष बांधला आणि 2017 च्या निवडणुकीत प्रचंड उलटफेर झाला नी भाजप तब्बल 45 जागांवर विजयी झाला. आता तर भाजपने अमरावतीमधून राज्यसभेवर (Rajya Sabha) डॉ अनिल बोंडे यांना खासदार म्हणून तर विधान परिषदेवर (Legislative Council) प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांना आमदार म्हणून प्रतिनिधीत्व दिले. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये उत्साह दुणावला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचा हा वरचष्मा मोडण्यासाठी स्थानिक पातळीवर काँग्रेसचे (Congress) डॉ. सुनील देशमुख आणि शिवसेना (Shiv Sena) तसेच स्थानिक पातळीवरील गटांची मोर्चेबांधणी सुरु आहेत. त्यात त्यांना कितपत यश येते? भाजपला गड राखता येतो का? शिवसेना, काँग्रेसह अपक्षांना खिंडार पाडता येते का? बच्चू कडू यांची भूमिका काय राहिल? यावर पुढील चित्र स्पष्ट होईल.
अमरावती शहरातील मुस्लीम बहुल पठानपूरा, पाटीपूरा, छाया नगर, ताज नगर, मौस नगर, हैदरपूरा, हनुमान नगर, आझाद कॉलनी, खोलापूरी गेट इत्यादी भाग या प्रभागात येतो.
अमरावती महपालिकेतील अंतिम प्रभाग रचनेनुसार, येथे 33 प्रभाग असून 98 वॉर्ड असतील. यातील अनुसूचित जातींसाठी 17, अनुसूचित जमातींसाठी दोन आणि महिलांसाठी 39 जागा राखीव आहेत.एकूण 33 प्रभागांपैकी 32 प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत. तर एक प्रभाग दोन सदस्यांचा आहे. अमरावतीची एकूण लोकसंख्या 6 लाख 47 हजार 057 एवढी आहे. महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे.
अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये एकूण लोकसंख्या 20 हजार 7490 एवढी आहे. येथे पुरुष मतदारांची संख्या एकूण 10,922 इतकी आहे तर स्त्री मतदारांची संख्या 9,826 इतकी आहे.
अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये 2017 मधील निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांची नावे पुढील प्रमाणे-
प्रभाग 19 अ- चेतन विजय गावंडे (भाजप)
प्रभाग 19 ब- रेखा ओमप्रकाश भुतडा(भाजप)
प्रभाग 19 क- मंजुषा प्रशांत जाधव (शिवसेना)
प्रभाग 19 ड- तुषार भारतीय (भाजप)
प्रभागात आरक्षण कसे?
प्रभाग 19 अ- सर्वसाधारण महिला
प्रभाग 19 ब-सर्वसाधारण महिला
प्रभाग 19 क- सर्वसाधारण
भाजप-45
शिवसेना-07
काँग्रेस-15
एमआयएम-10
बसपा-5
रिपाई (आठवले गट)-1
स्वाभिमानी पार्टी-3
अपक्ष- 1
एकूण- 81
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भारतीय जनता पार्टी | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | ||
एमआयएम | ||
बसपा | ||
स्वाभिमानी पक्ष | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भारतीय जनता पार्टी | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | ||
एमआयएम | ||
बसपा | ||
स्वाभिमानी पक्ष | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भारतीय जनता पार्टी | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | ||
एमआयएम | ||
बसपा | ||
स्वाभिमानी पक्ष | ||
अपक्ष |