NMC election 2022| नागपूर महालिका निवडणूक, भाजपाच्या ताब्यातील प्रभाग 16 मध्ये यंदाही कमळच फुलणार?

| Updated on: Aug 06, 2022 | 1:19 PM

नागपूर महापालिकेत यापूर्वीच्या निवडणुकीत चार वॉर्डांचा एक प्रभाग होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. तसेच नव्याने प्रभाग रचना करण्यात आल्याने प्रभाग क्रमांक 16 मधील परिसराचीही व्याप्ती बदललेली असू शकते.

NMC election 2022| नागपूर महालिका निवडणूक, भाजपाच्या ताब्यातील प्रभाग 16 मध्ये यंदाही कमळच फुलणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूरः  राज्यसभा, विधानसभा आणि थेट महाराष्ट्रातील विधानसभेत मोठा करिश्मा दाखवणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या होमटाऊनमध्येही भाजपचंच वर्चस्व आहे. आता तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांसोबत सत्ता मिळवल्यानंतर भाजपची (BJP) ताकद आणखी वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर याचा परिणाम निश्चित होणार. नागपूर महापालिका मागील १५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत म्हणजेच 2017 मधील निवडणुकीत 151 वॉर्डांपैकी 108 जागांवर भाजपचा विजय झाला होता. त्यापाठोपाठ काँग्रेस 29, शिवसेना 2 तर बसपाचे 10 नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे भाजपची एकहाती सत्ता असलेल्या नागपुरात यंदाही कमळ फुलेल, अशी शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 16 हा मागील वर्षी चार वॉर्डांचा होता. यंदा तो तीन वॉर्डांचा करण्यात आला आहे. या प्रभागावरही भाजपची सत्ता होती. 04 मार्च २०२२ रोजी नागपूर महापालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आला असून माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याऐवजी पालिकेवर सध्या प्रशासक कारभार पहात आहेत. येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात राज्यातील पहिल्या टप्प्यातील महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात नागपूर महापालिकेचीही रणधुमाळी निश्चित आहे.

लोकसंख्येचं गणित काय?

नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकूण लोकसंख्या 44 हजार 415 एवढी आहे. यापैकी अनुसूचित जातीतील मतदार 6 हजार 786 एवढे आहेत तर अनुसूचित जमातीतील मतदारांची संख्या 3857 एवढी आहे.

प्रभाग 16 मध्ये कोणता परिसर?

नागपूर शहरातील प्रभाग १६ मध्ये प्रामुख्याने राजनगर, न्यू कॉलनी, न्यू मानकापूर, बैरामजी टाऊन, जाफरनगर, सादीकाबाद कॉलनी, संत गाडगेबाबा सोसायटी, रोहनकर ले-आऊट, पागलखाना परीसर, पोलीस लाइन टाकळी, खुराना ले आऊट, छावणी, अंजूमन कॉलनी, मंगळवारी, लुंबीनी नगर हा परिसर येतो.

2017 मधील चित्र कसे?

नागपूर महापालिकेत यापूर्वीच्या निवडणुकीत चार वॉर्डांचा एक प्रभाग होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. तसेच नव्याने प्रभाग रचना करण्यात आल्याने प्रभाग क्रमांक 16 मधील परिसराचीही व्याप्ती बदललेली असू शकते. 2017 मधील प्रभाग 16 मधील विजयी आघाडी पाहता, हा प्रभाग पूर्णपणे भाजपच्या ताब्यात होता. त्यातील विजयी नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे-
वॉर्ड अ- लखन येरावार- भाजप
वॉर्ड ब-वनिता दांडेकर- भाजप
वॉर्ड क- लक्ष्मी यादव- भाजप
वॉर्ड ड- संदीप जोशी- भाजप

आरक्षणाची स्थिती अशी…

नागपूर महापालिकेतील आरक्षणही जाहीर झाले असून प्रभाग क्रमांक 16 मधील स्थिती पुढील प्रमाणे-
16 अ- अनुसूचित जाती महिला
16 ब- अनुसूचित जमाती
16 क- सर्वसाधारण

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 16 अ 

पक्षउमेदवारविजयी- आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 16 ब

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 16 क

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
इतर