EXPLAINER | हत्ती ठरले असते काँग्रेसचे निवडणूक चिन्ह… भाजप आणि काँग्रेसला कशी मिळाली पक्ष चिन्हे?

| Updated on: Jul 05, 2024 | 8:58 PM

तत्कालीन शंकराचार्य स्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांचे आशीर्वाद घेण्यासाठी इंदिरा गांधी आल्या. त्यांनी इंदिरा गांधी यांचे म्हणणे ऐकून काही वेळाने उजवा हात वर केला. त्यांना आशीर्वाद दिला. काँग्रेसच्या सध्याच्या निवडणूक चिन्हाची कहाणी इथून सुरू झाली.

EXPLAINER | हत्ती ठरले असते काँग्रेसचे निवडणूक चिन्ह… भाजप आणि काँग्रेसला कशी मिळाली पक्ष चिन्हे?
congress, bjp, bsp
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हात म्हणजेच पंजा तर भाजपचे ‘कमळ’ निवडणूक चिन्ह आहे. 1951 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे चिन्ह वेगळे होते. तर, कमळ चिन्ह मिळण्यापूर्वी भाजपचे काय चिन्ह होते? कोणत्याही पक्षाला निवडणूक चिन्ह कसे मिळते हे जाणून घेऊ… 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. मात्र, इंडिया आघाडीच्या तुलनेत भाजपला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आले. निवडणुक कोणतीही असली तरी मतदान करताना मतदार ईव्हीएमवर नेत्याचा चेहरा न पाहता निवडणूक चिन्ह पाहून मतदान करतात. भारतात जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या निवडणूक चिन्हांचाही स्वतःचा मनोरंजक इतिहास आहे. 1951 च्या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्ह वेगळे होते. मग, काँग्रेसला पंजा हे निवडणूक चिन्ह कसे मिळाले. भाजपला कमळ चिन्ह कसे मिळाले. हे या लेखातून जाणून घेऊ.

1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. 1951 मध्ये देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणूक लढविली. त्यावेळी कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह बैलजोडी होते. हे चिन्ह खूप प्रसिध्द झाले. जवळपास दोन दशके काँग्रेसचे बैलजोडी हे चिन्ह होते. 1970 च्या दरम्यान काँग्रेसमध्ये फूट पडून पक्ष दोन गटात विभागला गेला. त्यामुळे निवडणूक आयोगाने बैलजोडीचे चिन्ह गमावले. निवडणूक आयोगाने कॉंग्रेस नेते कामराज यांच्या कॉंग्रेसला तिरंग्यातील चरखा तर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला गाय वासरू चिन्ह दिले. मात्र, या चिन्हावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला.

1977 मध्ये आणीबाणी संपली. पण, इंदिरा गांधी यांची लोकप्रियता घसरली. कॉंग्रेसचे गाय आणि वासरू चिन्ह निवडणूक आयोगाने जप्त केले. इंदिरा गांधी यांनी तत्कालीन शंकराचार्य स्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांची हेत घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. काही वेळाने त्यांनी उजवा हात वर केला. इंदिरा गांधी यांना आशीर्वाद दिला. तेव्हापासून हाताचा पंजा हे काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह ठरले. 1979 मध्ये काँग्रेसच्या विभाजनानंतर इंदिरा गांधी यांनी काँग्रेस (आय) ची स्थापना केली.

समाजवादी पक्षाची ‘सायकल’ आणि बसपला हत्ती

इंदिरा गांधी यांनी पक्षांचे नेते बुटा सिंग यांना निवडणूक चिन्ह अंतिम करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पाठवले. निवडणूक आयोगाने त्यांना हत्ती, सायकल आणि पंजा असे तीन पर्याय दिले. शंकराचार्य यांच्या आशीर्वादाची जाणीव ठेवून इंदिरा गांधी यांनी पंजा हे निवडणूक चिन्हावर शिक्कामोर्तब केले. पंजा घेऊन निवडणूक लढलेल्या इंदिरा गांधी यांना या निवडणुकीत भरघोस मतदान झाले. हाताचा पंजा पक्षाला लाभदायक ठरले आणि तेव्हापासून कॉंग्रेसचे हेच चिन्ह कायम झाले. निवडणूक आयोगाने इंदिरा गांधी यांना दिलेली निवडणूक चिन्हापैकी उरलेली दोन चिन्हे नंतर अन्य दोन पक्षांना दिले. कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाला हत्ती तर मुलायम सिंह यांच्या समाजवादी पक्षाला सायकल हे निवडणूक चिन्ह मिळाले.

भाजपचा दिवा ते कमळ प्रवास

देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेससमोर अखिल भारतीय जनसंघाचे आव्हान होते. त्या निवडणुकीत जळणारा दिवा हे जनसंघाचे निवडणूक चिन्ह होते. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत किसान मजदूर प्रजा सोशालिस्ट पार्टी आणि भारतीय क्रांती दल हे जनसंघामध्ये सामील झाले आणि जनता पक्ष अस्तित्वात आला. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना नांगर घेऊन जाणारा शेतकरी हे चिन्ह दिले. 1980 मध्ये जनता पक्षाचे विघटन झाले. त्यामुळे जनसंघाच्या नेत्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना केली आणि त्याला निवडणूक आयोगाने कमळ हे चिन्ह दिले.