कोरोनामुळे रोजगार प्रभावित, सुधारणेसाठी काम सुरू, रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदी म्हणाले,…

| Updated on: Oct 22, 2022 | 6:55 PM

रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी नोकरीसाठी इच्छुक 75 हजार उमेदवारांना डिजीटल माध्यमातून नियुक्ती पत्र पाठविले.

कोरोनामुळे रोजगार प्रभावित, सुधारणेसाठी काम सुरू, रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदी म्हणाले,...
रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदी म्हणाले
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळं जगातली अर्थव्यवस्था प्रभावित झाली. यापासून भारतीय अर्थव्यवस्थाही दूर राहू शकली नाही. आधी कोरोमुळं रोजगार गेले. त्यानंतर रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रोजगार मेळाव्यात म्हणाले की, आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रोजगार मेळाव्याची सुरुवात केली. या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी नोकरीतील 75 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले. रोजगार मेळाव्याला संबोधित करताना मोदी म्हणाले, केंद्र सरकार युवकांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी काम करत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, अर्थव्यवस्थेची जागतिक स्थिती खराब आहे. कित्तेक मोठ्या अर्थव्यवस्था संघर्ष करत आहेत. कित्तेक देशात बेरोजगारी आणि महागाईच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनाचे साईड इफेक्ट 100 दिवस दूर होणार नाहीत.

समस्यांशी झुंज देण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी नोकरीसाठी इच्छुक 75 हजार उमेदवारांना डिजीटल माध्यमातून नियुक्ती पत्र पाठविले. 38 मंत्रालयांअतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्यात.

गृप ए आणि बी (राजपत्रीत), गृप बी (अराजपत्रीत) आणि गृप सीमध्येही विविध स्तरावर नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. ज्या पदांवर नियुक्ती केली जात आहे त्यामध्ये केंद्रीय सशस्त्र दल, उपनिरीक्षक, कान्स्टेबल, स्टेनोग्राफर, पीए, आयकर निरीक्षक आणि एमटीएस या पदांचा समावेश आहे.