मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी त्यांच्यासह गेलेल्या आमदारांनी एकमुखाने केली होती. अखेरीस त्यांची ही मागणी मान्य झाली आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या सत्ता संघर्षाचा शेवट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एकानाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली आहे(New CM Of Maharashtra). मी कोणतेही मंत्रीपद घेणार नाही. मी सत्तेतच्या बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार. काम करेल, असं फडणवीस यांनी जाहीर केलंय. यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल (Remote Control Of Power) देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात राहील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
भाजपकडे १२०चा आकडा असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रीपद भाजपही घेऊ शकले असते. मात्र, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवत देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. संख्याबळानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वत: मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र, ऐनवेळी एकनाथ शिंदेच्या नावाची घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांनी या सत्ता संघर्षाच्या लढाईत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट आणला.
एकनाथ शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. त्यांच्या इतक्या मोठ्या मनाचा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही असे एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले. मोदी शहा, फडणवीसांचे आभार मानतो. ही ऐतिहासिक घटना आहे. कुणाला मंत्रिपद पाहिजे असं नाही. मी कुठलीही अपेक्षा केली नव्हती. पण जे काही घडलं ते वास्तव आपल्यासमोर आहे असे शिंदे म्हणाले.
राज्याला विकासाच्या दिशेने नेऊ. ते आमच्यासोबत आहेत. त्यांचं मार्गदर्शन राहील. त्यांनी उदारता दाखवली. ही उदारता दुर्मिळ आहे असं म्हणत पुन्हा एकदा शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. महाराष्ट्रात एक मजबूत सरकार येईल. मोदी, शहा आणि नड्डाजींचं पाठबळ मिळेल. ज्या राज्याबरोबर केंद्राची ताकद उभी राहते तिथे विकासात कोणताही अडथळा येणार नाही. हे सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात कटिबद्ध आहे असे शिंदे म्हणाले.