कराडः भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळालीय. त्यानंतर उदयनराजे भोसलेंना पत्रकारांनी शिवेंद्रराजेंच्या प्रश्नावर छेडलं असता उदयनराजेंनीही आपल्या शैलीत उत्तर दिलेय. शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच, असं वक्तव्य त्यांनी केलंय. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची असल्यामुळे उदयनराजेंच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची जिल्ह्यात जोरदार चर्चा असून, नेत्यांच्या गाठीभेटीही वाढल्यात. अनेक राजकीय पक्षांचे नेते या निमित्तानं पुन्हा एकदा सक्रिय झालेत. मी माझ्या बंधूंना गेले अनेक दिवस सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षातच येत नाही. मतदारांनी सांगितले तर फॉर्म विड्रॉ करेन, बाकी कोणाच्या सांगण्याने नाही, असंही उदयनराजे काल म्हणाले होते.
जिल्हा बँक निवडणुकीत आता मी ढवळाढवळ करू का, असा इशारा उदयनराजेंनी राष्ट्रवादीसह विरोधकांना दिला होता. मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का? पण माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात. आता मी ढवळाढवळ करू का? असा सवाल करत त्यांनी जोरदार फटकेबाजी केली होती. मी माझ्या बंधूंना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही, असं म्हणत त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना टोला लगावला होता.
अजून गाठी भेटी संपायच्या आहेत. सर्व मतदार आहेत. कुठे जायचे ते मी ठरवतो. सर्व समावेशक पॅनेलमध्ये जायचे का नाही ठरवायचेय. मी लोकांच्या सोबत आहे. मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का? पण माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता.
इतर बातम्या :
नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्राने देशाची माफी मागावी; संजय राऊत यांची मागणी