मुंबई : आज पुन्हा एकदा शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मिंधे गटाला पुढे करून कमळबाई कायद्याला नाचवत असल्याची टीका शिवसेनेने केली होती. आता या टीकेला भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझा तो बाब्या असं सध्या शिवसेनेचं सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. 2019 ला शिवसेनेने कसा विश्वासघात केला हे सर्वांनी पाहिलं. युतीत लढून बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांसोबत यांनी आघाडी केली, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सध्या माझा तो बाब्या असं शिवसेनेचं सुरू आहे. युतीत लढून बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांसोबत यांनी आघाडी केली. 2019 ला शिवसेनेने कसा विश्वासघात केला हे सर्वांनी पाहिलं. हे 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार, मोदींनी दाखवलेली दिशा, मोदींनी केलेली विकास कामे यांचा आधार घेऊन निवडून आले. निवडून आल्यानंतर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
‘सामना’च्या संपादकीयमधून भाजप आणि शिंदे गटावर आज जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मिंधे गटाला पुढे करून कमळाबाई कायद्याला नाचवत आहे. सर्व घटनात्मक संस्था कमळाबाईनं आपल्या पदरी खोचल्या असून, मिंधे गटाला दिलासे दिले जात आहेत. आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची अवलाद कमळाबामुळे महाराष्ट्राच्या विरोधात उभी राहिल्याचा घणाघात सामनामधून करण्यात आला होता. आता या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.