मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. देशात आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मात्र भारतात निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन रशियातून नियंत्रित केल्या जात आहेत, असा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. नुकत्याच मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा धक्कादायक आरोप केला आहे. नुकत्याच आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडूंनी हा आरोप केला आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांसह विविध विरोधी पक्षनेते हजर होते.
सध्या देशात लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅटचाही वापर करण्यात येणार आहे. आतापर्यंत पार पडलेल्या लोकसभेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अनेकदा ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे अनेक विरोधी पक्षांनी दावा केला आहे.
त्यात आता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मला भारतात वापरण्यात येणार ईव्हीएम मशीनाबाबत चिंता वाटते. भारतातील निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम मशीन हे रशियातून नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे या मशीन या मशीन कित्येकदा खराब झाल्याचा, त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचा किंवा ते हॅक झाल्या आहेत. तसेच सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीत विजयी होण्यासाठी ईव्हीएम मशीनसाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.
याआधीही चंद्राबाबू नायडू यांनी ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आंध्रप्रदेशातील 4 हजार 583 ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे या मशीन बंद पडल्या. या पार्श्वभूमीवर चंद्राबाबूंनी एका पत्रकार परिषदेत आंधप्रदेशातील 150 मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.