सांगली : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली. “राजू शेट्टी भंपक माणूस आहे. ते भ्रमिष्ठ झालेत. गावात जसा सोडलेला वळू असतो तसा राजू शेट्टी हा वळू रेडा आहे. जसा वळू जिथं तिथं तोंड घालतो, तसं राजू शेट्टी जिथं तिथं तोंड घालत आहे”, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली. (Sadabhu Khot attacks on Raju Shetti)
राजू शेट्टी यांची मस्ती हातकणंगले मतदारसंघातील लोकांनी उतरवली आहे. राजू शेट्टी हे पाय चाटण्यासाठी बारामतीला गेले, जिथं जाईल तिथं पाठीत खंजीर घुपसायचा असा त्यांचा उद्योग आहे, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला.
राजू शेट्टी यांच्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो, त्यामुळे त्यांचे सर्व कारनामे मला माहिती आहेत. यांच्यासारखं 300 एकर जमीन कुठं घेऊन ठेवल्या नाही, पेट्रोल पंप कार्यकर्त्यांच्या नावावर घेऊन ठेवल्या नाहीत, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.
दूध दरवाढ आंदोलन यशस्वी, मात्र अनेक ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री तुम्ही चुकीच्या लोकांच्या पंगतीला जाऊन बसला आहात, राजू शेट्टी यांनी भीक मागून आमदारकी मिळते का बघावी, असा घणाघात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. (Sadabhu Khot attacks on Raju Shetti)
संबंधित बातम्या
Raju Shetti | दूध आंदोलन चिघळणार, राजू शेट्टींचा सरकारला 5 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम