मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी आज (15 सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपण आत्तापासून भाजप-आरएसएससोबत असल्याची घोषणा केली आहे (Ex Navy Officer Madan Sharma say he is with BJP RSS). त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा जोरदार प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
माजी नौदल अधिकारी मदन शर्मा म्हणाले, “आत्तापासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे. जेव्हा मला मारहाण झाली तेव्हा त्यांनी माझ्यावर मी भाजप-आरएसएससोबत असल्याचा आरोप केला. त्यामुळे आता मी घोषणा करतो की आजपासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे.”
From now on, I am with BJP-RSS. When I was beaten up, they had levelled allegations that I’m with BJP-RSS. So now I announce, that I am with BJP-RSS today onward: Madan Sharma, retired Navy officer who was beaten up allegedly by Shiv Sena workers in Mumbai, after meeting Governor pic.twitter.com/Z5SJ13X4NF
— ANI (@ANI) September 15, 2020
दरम्यान, माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी रात्री दोन वाजता शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अटक केली आहे. या सर्वांना बोरिवली कोर्टात हजर करण्यात आलं. याआधीही या सर्वांना अटक करण्यात आली होती. मात्र, तेव्हा त्यांना जामीन मंजूर झाला होता. आता समता नगर पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता कलम 452 अंतर्गत देखील गुन्हा नोंद केला आहे.
संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आरोपींकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यांना पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा हजर राहण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला.
संबंधित बातम्या :
नि. नौदल अधिकारी मारहाण : मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे या हल्ल्याचे समर्थन : नवनीत राणा
संबंधित व्हिडीओ :
Ex Navy Officer Madan Sharma say he is with BJP RSS