EXCLUSIVE : रोड शोदरम्यान अमित शाहांची टीव्ही 9 कडे पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

गांधीनगर: भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये भव्य रोड शो काढला. या रोड शोनंतर अमित शाह गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या रोड शोपूर्वी भाजपची जाहीर सभा झाली. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. या रोड शोदरम्यान अमित शाह […]

EXCLUSIVE : रोड शोदरम्यान अमित शाहांची टीव्ही 9 कडे पहिली प्रतिक्रिया
Follow us on

गांधीनगर: भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये भव्य रोड शो काढला. या रोड शोनंतर अमित शाह गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या रोड शोपूर्वी भाजपची जाहीर सभा झाली. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

या रोड शोदरम्यान अमित शाह यांनी टीव्ही 9 मराठीकडे एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. अमित शाह म्हणाले, “रोड शोमध्ये जमलेला जनसागर हा मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी इच्छुक आहे. किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे लोक एकत्र आले आहेत. मी 25 वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहे. पुन्हा एकदा जनतेतून निवडून येऊन, गौरवाने लोकसभेत जाईन”

VIDEO:

अमित शाह हे गांधीनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. गांधीनगर हा भाजपचा परंपरागत मतदार संघ आहे. गांधीनगर गुजरातच्या राजधानीचं शहर असल्यामुळे विशेष महत्व आहे. 1989 मध्ये भाजपने पहिल्यांदा गांधीनगर लोकसभा मतदारसंघ जिंकला. 1989 मध्ये भाजपचे शंकरसिंह वाघेला गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. 1991 मध्ये लालकृष्ण अडवाणी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर 1996 मध्ये अटलबिहारी वाजपेयी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. मग 2014 मध्ये लालकृष्ण अडवाणी गांधीनगरमधून 4,83,121 मतांनी विजयी झाले.

लालकृष्ण अडवाणी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा लोकसभेवर गेले. एकंदरीत पाहता गांधीनगर आणि भाजपा असं समीकरण आहे.