Fadnavis on Rana Arrest : नवनीत राणासह पतीलाही मुंबई पोलिसांकडून अटक, घटना व्यथित करणारी, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Apr 23, 2022 | 7:41 PM

मुंबई : सध्या राज्यात हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच आपण आज मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा वाचणार म्हणून रणशिंग फुकले होते. दरम्यान कालपासून मातोश्रीच्या शिवसैनिकांनी घेरावबंदी करत राणा दाम्पंत्यांनी […]

Fadnavis on Rana Arrest : नवनीत राणासह पतीलाही मुंबई पोलिसांकडून अटक, घटना व्यथित करणारी, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : सध्या राज्यात हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच आपण आज मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा वाचणार म्हणून रणशिंग फुकले होते. दरम्यान कालपासून मातोश्रीच्या शिवसैनिकांनी घेरावबंदी करत राणा दाम्पंत्यांनी येथे येऊन दाखवावे असे म्हटले होते. यानंतर कायदा आणि सुव्यवस्था टिकावी म्हणून मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यादरम्यानच काल मोहित भारतीय यांच्यावर शिव सैनिकांनी हल्ला केला होता. दरम्यान, आज नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना भादंवि कलम 153 अ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यावरून आता माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी ट्विटरवरू ट्विट करताना, ठाकरे सरकारला काही सवाल केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत, असे म्हटलं आहे.

घटना व्यथित करणार्‍या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला करताना, ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला त्याविरोधात साधा गुन्हा दाखल नाही. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा करण्यात आली याची साधी दखल सुद्धा घेण्यात आलेली नाही. तर हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर त्यांना थेट अटक करण्यात येते. या महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत, असे म्हटले आहे.

निव्वळ लज्जास्पद

तसेच त्यांनी आपल्या एका दुसऱ्या ट्विटमध्ये इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार. एवढीच तुमची मदुर्मकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या. पण, जनता सारे काही पाहते आहे ! असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी, निव्वळ लज्जास्पद असल्याचे म्हटले असून लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपल्याचे लिहले आहे. तर लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का? असा सवाल उपस्थित केला आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही

दरम्यान याच्या आधी फडणवीस यांनी, मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

तर मुंबई पोलिसांवर आपला रोक राखताना, आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार? असा सवाल उपस्थित केला होता. तसेच मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच, असेही त्यांनी म्हटले होते. तर मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

 

इतर बातम्या :

Breaking News: राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार जशास तशी

Narayan Rane on Navneet Rana: राणांना घरातून बाहेर काढण्यासाठी मी जातोय, बघू कोण अडवतोय?; नारायण राणेंचं शिवसेनेला आव्हान

Breaking News : अखेर राणा दाम्पत्याला मुंबईत अटक, आजची रात्र पोलिस ठाण्यात जाणार? चिथावणीखोर वक्तव्याचा आरोप