मुंबई : राज्याचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्रीपदी बसावं लागलं. बंडखोर एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या राज्यातील मोठ्या नेतृत्वाला एकनात शिंदेंच्या हाताखाली काम करावं लागत असल्याची टीका मागच्या काही दिवसांपासून होतेय. तर फडणवीसांना हा भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाचा मोठा झटकाही मानला जातोय. या सगळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उपमुख्यमंत्री करा आणि मला प्रदेशाध्यक्ष करा, ही देवेंद्र फडणवीसांची मागणी देखील केंद्रीय नेतृत्वानं मान्य न केल्यानं त्यांच्यावर अन्याय झाल्याचं चित्र आहे. भाजपच्या गोटात हे सगळं सुरू असताना शिवसेनेनं याच मुद्द्यावर बोट ठेवत फडणवीसांना लक्ष केलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या (saamana) ‘रोखठोक’ या शिवसेना नेते संजय राऊतांच्या सदरातून फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलंय.
रोखठोक या सदात शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट फडणवीसांवर टीका कालीय. त्यात ते लिहितात, ‘पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते. ‘मला उपमुख्यमंत्रीपद नको. चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा,’अशी त्यांची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली. कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली.’
‘महाराष्ट्रात भूकंप झाला व असा भूकंप राजकारणात कधी झालाच नव्हता असे वर्णन एकनाथ शिदेंच्या बंडाबाबत झाले, पण त्या बंडापेक्षा मोठा भूकंप नऊ दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडामागचे चाणक्या म्हणून संपूर्ण मीडिया देवेंद्र फडणवीस यांनी श्रेय देत होता. पण, सत्य वेगळेच होते. हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवले व महाराष्ट्रातील भाजप त्याबाबत पूर्ण अंधारात होता. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे.’
‘2019 मध्ये सत्तेचा 50-50 टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला नाही व महाविकास आघाडीचे सरकार त्यामुळे निर्माण झाले. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले व आता बंडखोर शिवसैनिक शिंदे यांना हे पद भाजप हायकमांडने दिले. काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे.’