Nitesh Rane | ‘पत्राला उत्तर न दिल्यास आयुक्तांवर हक्कभंग आणणार
भाजप आमदार नितेश राणे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहलं आहे. उत्तर न दिल्यास येणाऱ्या अधिवेशनात आयुक्तांच्या विरोधात हक्कभंन्ग आणावा लागेल असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहलेलं आहे. गिरगाव चौपाटीवरच्या व्ह्युविंग गॅलरीला CRZ ची परवानगी नाही. असं म्हणत नितेश राणे यांनी पालिका आयुक्तांना गॅलरी संदर्भात पुन्हा एकदा पत्र लिहलं आहे. पत्राला जर उत्तर दिलं नाही तर आयुक्तांवर हक्कभंग आणणार असं ही यावेळी आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.राणे याच्या घराला जिल्हाधिकारी यांनी सीआरझेड बाबत नोटीस दिल्यावर पालिकेच्या विरोधात नितेश राणे आक्रमक झाले आहेत. या आधी सुद्धा नितेश राणे यांनी या गॅलरी बाबत आक्षेप घेतला होता पण पालिकेने त्याला उत्तर दिलं नाही. आता उत्तर न दिल्यानं येणाऱ्या अधिवेशनात आयुक्तांच्या विरोधात हक्कभंन्ग आणावा लागेल असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
Published on: Jun 01, 2022 01:51 PM