नाशिक: येवल्याच्या नागरसुल येथील कृष्णा डोंगरे हा तरुण शेतकरी शेतमालाला भाव नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहे. सध्या त्याचे अर्धनग्न आंदोलन सुरु असून, 2 दिवसापूर्वी त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून, कृष्णा डोंगरे यांनी कुठलीही गडबड करु नये म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून स्थानिक साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आहे.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने काढलेल्या अल्बमसाठी त्यांना 500 रुपये द्यायचे होते. मात्र पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचे कृष्णा डोंगरेने सांगितले.
शेतकऱ्याचं अर्धनग्न आंदोलन
कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळतोय. त्याला वाचा फोडण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पाच एकरात असलेले कांदे जाळून शासनाचा निषेध केला. मात्र कुठलीही दखल न घेतल्याने लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगात असलेला शर्ट, बनियन आणि पायातील चप्पलही मोदींना पाठवली. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत अर्धनग्न अवस्थेत राहून या शासनाच्या विरोधात लढा सुरु ठेवणार आहे, अशी घोषणा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसुल येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली. याबाबतचं निवेदनही त्यांनी पवारांना दिलं.
संबंधित बातमी
मोदी सरकार जाईपर्यंत शर्ट घालणार नाही, पवारांसमोर तरुणाचा निर्धार