रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा, MIM चा आक्रमक पवित्रा

| Updated on: Aug 21, 2021 | 11:10 AM

भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz jalil) यांनी केली आहे. भाजपच्या जनशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.

रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा, MIM चा आक्रमक पवित्रा
imtiaz-jaleel
Follow us on

औरंगाबाद : भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz jalil) यांनी केली आहे. जनशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी (Jan Ashirvad Yatra) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे.

भाजपच्या जनशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली. याच गर्दी प्रकरणी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. तसंच एमआयएमवर गुन्हे दाखल करता मग मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी पोलिस प्रशासनाला विचारला.

मंत्र्यांवर गुन्हे दाखल नाही, आमच्यावरच का?, जलील यांचा सवाल

इम्तियाज जलील म्हणाले,  “माझ्याकडे एक व्हिडीओ आला आहे, ज्या व्हिडीओत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं कार्यकर्ते स्वागत करताना दिसून येत आहे. यामध्ये दानवेंनी मोठी गर्दी जमवली आहे. तसंच दुसरे मंत्री भागवत कराड यांच्याही जनआशीर्वाद यात्रेत मोठी गर्दी होती”

“परवा स्वातंत्र्यदिनाला आम्ही आंदोलन केलं. पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. आमच्या स्वार्थासाठी ते आंदोलन केलेलं नव्हते. जिल्ह्याच्या विकासासाठी ते आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर माझ्यासह माझ्या 24 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मग आता मला पोलिसांना विचारायचंय, की आमच्यावर फटाफट गुन्हे दाखल करता मग आता भाजपच्या राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का? आणि करणार नसाल तर का करणार नाही?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पोलिस प्रशासनाला केला आहे.

भाजपच्या मंत्र्यांची जनसंवाद यात्रा

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची सध्या जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रात देखील केंद्रीय मंत्री विविध ठिकाणी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील या मंत्र्यांची सध्या जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

(File charges against Union Ministers of State Raosaheb Danve And Bhagwat karad demanded MIM MP Imtiaz Jalil)

हे ही वाचा :

मनसे-भाजप युतीची मुहूर्तमेढ औरंगाबादेतून? महत्त्वाच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष!

मोठी बातमी: अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी गजानन काळेंची पत्नी कृष्णकुंजवर