मुंबई : केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याने भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साह संचारला असून (BJP-Shivsena) भाजपा-शिवसेनामध्ये खरा सामना रंगणार आहे तो महापालिका निवडणूकीमध्ये. दरम्यान, त्याच अनुशंगाने मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. यामध्ये अमित शाह यांनी ज्यांनी धोका दिला त्यांना माफी नाही, असे म्हणत शिवसेनेविरोधात आता थेट भूमिका घेतली आहे. मात्र, हे सर्व होत असले तरी भाजपाचा राज्यात विस्तार आणि केंद्रात केलेले सहकार्य यामुळे उपकाराची जाणीव ठेवा असा सल्लाच (Arvind Sawant) अरविंद सावंत यांनी भाजपाला दिला आहे. त्यामुळे भाजप आक्रमक स्वरुपात असली तरी शिवसेनेकडून त्यांनी भाजपासाठी काय केले आहे हे आठवण करुन देण्याची वेळ आली आहे. मात्र, असे असले तरी आगामी काळात या दोन पक्षात काटे की टक्कर ही निश्चित मानली जात आहे.
2019 च्या निवडणूकांपूर्वी सेनेला असेच अव्हान देण्यात आले होते. मात्र, निकाल समोर येताच हेच अमित शाह हे मातोश्रीवर दाखल झाल होते. त्यानंतरच लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता. त्या दरम्यानच, विधानसभा निवडणूकांचे स्वरुप कसे असणार हे देखील ठरल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले. एवढेच नाही तर जागा वाटपही कसे असणार निश्चित झाले होते. पण आकड्यांचा खेळ जुळला नाही आणि भाजपानेच शिवसेनेला धोक्या दिल्याचे सावंतांनी सांगितले आहे. त्यावेळी पट्टक देंगे म्हणणारे मातोश्रीवर आले आताही काही सांगता येत नाही असेही ते म्हणाले आहेत.
सुरवातीच्या काळात भाजपाला राज्यात शिवसेनेची साथ मिळाली म्हणूनच हे आजचे चित्र आहे. एवढेच नाहीतर पंतप्रधान मोदी ज्या पदावर आहेत त्यामध्येही देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. काळाच्या ओघात आणि सत्तेपुढे याची त्यांना जाणीव राहिलेली नाही. किमान उभारीच्या काळात केलेले सहकार्य आठवूण तरी त्यांनी शिवसेनेबद्दल वक्तव्य करणे गरजेचे आहे असा सल्ला सावंत यांनी दिला आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणत होते, की तुम्ही राष्ट्र बघा आम्ही राज्य सांभाळतो, पण सत्तेची हावस त्यांना स्वस्त बसू देत नाही.
2014 च्या लोकसभा निवडणूकीत दोन जागेवरून भाजपाने युती तोडली होती. तेव्हा कुठे गेले होते हिंदूत्व, मात्र 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीत पायाखालची वाळू सरकरल्यानेच पुन्हा अमित शाह हे मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही, असे म्हणत अमित शाह हे पुन्हा मातोश्रीवर येतील असे सूचक विधान सावंत यांनी केले आहे.