Sheila Dikshit passes away नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांचं निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. शीला दीक्षित गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. एकीकडे आजाराशी झुंज देत असताना, दुसरीकडे त्यांचं संघटनात्मक काम सुरुच होतं. कालच त्यांनी पक्षात काही संघटनात्मक बदल केले होते.
शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांनी दिल्लीचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. शीला दीक्षित या 1998 ते 2013 पर्यंत सलग 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. शीला दीक्षित यांच्या जाण्याने दिल्लीच्या राजकारणासह काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Former Delhi Chief Minister & Congress leader Sheila Dikshit, passes away in Delhi at the age of 81 years. (file pic) pic.twitter.com/8rqv8qfnAQ
— ANI (@ANI) July 20, 2019
ज्या वर्षी हरल्या, त्याच वर्षी मुख्यमंत्री झाल्या!
शीला दीक्षित यांना दिल्लीच्या विकासाचा चेहरा म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याच कार्यकाळात दिल्लीत अनेक विकासकामं झाली. दीक्षित यांनी महिलांच्या स्थितीबाबत संयुक्त राष्ट्राच्या आयोगात 5 वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व केलं. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात 1986 ते 1989 दरम्यान त्यांनी संसदीय कार्य राज्यमंत्रीपद सांभाळलं होतं. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या लाल बिहारी तिवारी यांनी पूर्व दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला. मात्र त्याच वर्षी शीला दीक्षित मुख्यमंत्री झाल्या.
शीला दीक्षित यांच्या पश्चात मुलगा संदीप दीक्षित आणि मुलगी लतिका सैय्यद आहेत. संदीप दीक्षित हे काँग्रेसचे खासदार होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया
दरम्यान, शीला दीक्षित यांच्या निधनाचं वृत्त समजताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला. “नुकतंच शीला दीक्षित यांच्या निधनाचं धक्कादायक वृत्त समजलं. त्यांच्या जाण्याने दिल्लीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांचं योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, कुटुंबीयांचं सांत्वन” असं केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटलं.
Just now got to know about the extremely terrible news about the passing away of Mrs Sheila Dikshit ji. It is a huge loss for Delhi and her contribution will always be remembered. My heartfelt condolences to her family members. May her soul rest in peace
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 20, 2019
राष्ट्रपतींकडून श्रद्धांजली
दिल्ली की पूर्व मुख्यमंत्री और एक वरिष्ठ राजनेता श्रीमती शीला दीक्षित के निधन के बारे में जानकर दुख हुआ। उनका कार्यकाल राजधानी दिल्ली के लिए महत्वपूर्ण परिवर्तन का दौर था जिसके लिए उन्हें याद किया जाएगा। उनके परिवार व सहयोगियों के प्रति मेरी शोक-संवेदनाएं — राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) July 20, 2019
राहुल गांधी यांच्याकडून शोक व्यक्त
I’m devastated to hear about the passing away of Shiela Dikshit Ji, a beloved daughter of the Congress Party, with whom I shared a close personal bond.
My condolences to her family & the citizens of Delhi, whom she served selflessly as a 3 term CM, in this time of great grief.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2019
शीला दीक्षित यांचा अल्पपरिचय