मुंबई : अनिल देशमुख यांच्या जामिनावर (Anil Deshmukh Bail denied) मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाचा महत्वाचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. 100 कोटींच्या वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सध्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) आर्थर रोड (Arthur Road Jail) कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा जामीनअर्ज पीएमएलए कोर्टानं फेटाळून लावला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.
नुकताच सीबीआयने अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवला होता. तसेच या प्रकरणातील संबंधित आरोपींचा देखील सीबीआयने जवाब नोंदवलेला. आपल्या जवाबात यांनी काय माहिती दिली याबाबत त्यांनी जास्त काही बोलण्यास अॅड. जयश्री पाटील यांनी नकार दिला होता. मात्र भ्रष्टाचार प्रकरणात आम्ही लढा देत आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. डॉ. पाटील यांनी 21 मार्च 2021 रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी तक्रार दाखल केली होती.
महाविकास आघाडीमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ यांच्यावर झालेली ईडी कारवाई असो वा राज्यातील ईडी सत्र, यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊतांनी एक महत्वाचं विधान केलंय. तपास यंत्रणांना टार्गेट दिलं जातंय, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केलाय. तर तपास यंत्रणांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते असल्याचंही राऊत यावेळी म्हणालेत.
आकाश, किरणच्या आत्महत्येचा एकमेकांशी काय संबंध? गळफास घेत आयुष्य संपवलं! नागपुरात खळबळ
लातूरमधील पोलीस कर्मचारी आत्महत्या प्रकरण, सुसाईड नोटवरुन 12 जणांवर गुन्हा
Pune crime| बापरे! पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाचा दहावीतील मुलीवर चाकू हल्ला