जालना : मराठवाड्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा (Babanrao Lonikar Criticize Mahaviakas Aghadi), अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत जाहीर करावी, अशीही मागणी लोणीकरांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे त्यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कृषी मंत्री दादासाहेब भुसे हे स्वतःला शिवसेनेचे ढाण्यावाघ असल्याचे म्हणतात, मग ते शेतकऱ्यांना तात्काळ मदत का करु शकत नाही, असा सवालही लोणीकरांनी विचारला आहे (Babanrao Lonikar Criticize Mahaviakas Aghadi).
शेतकरीवर्गाने पीक विमा भरला, आता प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतात पाणी साचलं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपन्यांकडे मणूष्यबळ नाही. जालन्यात रिलायन्स पीक विमा कंपन्यांचे फक्त तीन कर्मचारी आहेत. ते कसे काय संपूर्ण जिल्ह्यातील शेतीची पाहणी करणार आणि पंचनामे करणार, असा प्रश्न लोणीकर यांनी विचारला आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी घोषणा केली होती. कोरोनाच्या काळातील वीजबिल माफ करु, राज्यातल्या शेतकऱ्यांना छोट्या व्यापाऱ्यांना, सर्वसामान्यांना या संकटाच्या काळात मोफत विजेची घोषणा केली होती. हवेत गोळीबार केला, पण तो फुसकाबार निघाल्याची टीका माजी मंत्री लोणीकरांनी केली (Babanrao Lonikar Criticize Mahaviakas Aghadi).
राऊत साहेबांनी केलेली घोषणा त्याची अंमलबजावणी झालीच नाही, अर्थमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न मान्य केला नाही. वीजबिल खूप येत आहे, संपूर्ण वीजबिल माफ करण्या0त यावे, असे देखील लोनिकरांनी म्हटलं. ओला दुष्काळ जाहीर झाला की, आपोआप वीजबिल माफ होऊ शकतं. शेतकरी असो की सामान्य नागरिक असो, यांचे वीजबिल सरकारने माफ करणे आवश्यक असल्याचं मत लोणीकर यांनी म्हटलं.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दोन अडीच तासाची झालेली भेट ही कशासाठी होती, हे तेच सांगू शकतील, अस माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. परंतु राज्यात भाजपा आणि शिवसेना तीस वर्ष एकत्र होती. आज आम्ही जरी वेगळे असलो, तरी शेवटी 30 वर्ष एकत्र काम केलेले आहे. आम्ही शिवसेनेसोबत हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आमची युती होती. वर्षभरात ते कधी एकत्र कदाचित ते बसले नसतील आणि काही मुद्यावर त्याची बैठक होऊन चर्चा झाली. ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी होती. परंतू विरोधी पक्षनेते एकमेकांच्या घरी जातात स्नेहभोजन घेतात, महाराष्ट्राची ही परंपरा आहे. मात्र संजय राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीने महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले असल्याचे लोणीकर यांनी म्हटलं.
नानाजी देशमुख या योजनेचे मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे मोठं काम सुरु झालं होतं, आता ते सगळे काम थांबलेले आहे. योजना चालू करण्यासाठी कृषीमंत्र्याकडे मागणी केली असून मुख्यमंत्र्याकडे सुद्धा मागणी करणार असल्याचे लोणीकरांनी म्हटलं.
आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू : देवेंद्र फडणवीसhttps://t.co/pqVIuDdEuz #Devendrafadnavis #SanjayRaut #ShivSena @Dev_Fadnavis @rautsanjay61
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 27, 2020
Babanrao Lonikar Criticize Mahaviakas Aghadi
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार ‘वर्षा’वर, पाऊण तास चर्चा
आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य
फडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत