माजी मंत्री आज हाती बांधणार शिवबंधन; संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन

| Updated on: Oct 20, 2022 | 11:25 AM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. संजय राठोड यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखण्यात आली आहे.

माजी मंत्री आज हाती बांधणार शिवबंधन; संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन
Follow us on

मुंबई :  शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) हे आज हाती शिवबंधन बांधणार आहेत. संजय देशमुख हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शिंदे गट व भाजपात दाखल होत असताना आता दुसरीकडे ठाकरे गटात देखील इनकमिंग सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी बुलडाण्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता माजी मंत्री संजय देशमुख हे देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

नेमकं काय म्हणाले देशमुख?

आपण ठाकरे गटात प्रवेश का करत आहोत? याचं कारण संजय देशमुख यांनी सांगितलं आहे. मी आधी शिवसैनिकच होतो. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो. सध्याची जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, तिच्या पार्श्वभूमीवर मी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने काही लोकांना सर्व काही देऊन देखील त्यांनी शिवसेनेला धोका दिला. ते पक्षातून बाहेर पडले. हे पाहून माझ्यातला शिवसैनिक जागा झाला. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांचा देखील आग्रह होता. त्यामुळे आज शेकडो कार्यकर्त्यांसह हाती शिवबंधन बांधणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राठोड यांना शह देण्यासाठी रणनीती

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या ज्या आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामध्ये आमदार संजय राठोड यांचा देखील समावेश होता. संजय राठोड यांना रोखण्यासाठी आता ठाकरे गटाकडून रणनीती तयार करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून संजय देशमुख हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.