नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) सर्वेसर्वा एचडी देवेगौडा पुन्हा राजकीय रिंगणात उतरत आहेत. 87 वर्षीय देवेगौडा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहानंतर देवेगौडा यांनी कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली. (Former Prime Minister HD Devegowda to contest Karnataka Rajyasabha Election)
एचडी देवेगौडा उद्या (मंगळवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देवेगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी याबाबत माहिती दिली. जेडीएसचे विद्यमान खासदार कुपेंद्र रेड्डी यांच्या जागी देवेगौडा उमेदवारी दाखल करतील. देवेगौडा यांची बिनविरोध वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.
Former Prime Minister HD Devegowda (in file pic) has decided to contest Rajya Sabha polls at the request of our party legislators, Congress President Sonia Gandhi&many other leaders. Tomorrow, he’ll be filing nomination: HD Kumaraswamy, Janata Dal (Secular). #Karnataka pic.twitter.com/kPW0i6dtig
— ANI (@ANI) June 8, 2020
जेडीएसचे नेते, आमदार यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहानंतर देवेगौडा यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली. सोनिया गांधी यांनी देवेगौडा यांना फोन करुन विनंती केली होती.
हेही वाचा : विधान परिषद निवडणूक : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी काँग्रेसची फिल्डिंग?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. देवेगौडा यांनी तुमकूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.
कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागा आहेत. 19 जून रोजी मतदान होणार आहे. कर्नाटकमधून एका उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याइतक्या मतांची बेगमी काँग्रेसकडे आहे. यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दोन जागा भाजपला मिळणे निश्चित मानले जाते.
मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडून येण्यासाठी आवश्यक मतांव्यतिरिक्त काँग्रेसकडे 14 आमदारांची मते शिल्लक राहणार आहेत. या आमदारांच्या मतांचा वापर काँग्रेस देवेगौडा यांच्यासाठी करण्याचा अंदाज आहे. (Former Prime Minister HD Devegowda to contest Karnataka Rajyasabha Election)