सोलापूर : शिवसेना नेते महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेनंतर सोलापुरातील (Solapur) आणखी एक दिग्गज शिवसेना नेता (Shivsena) राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलीप माने यांनी काँग्रेसला रामराम करुन शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र दोन वर्षांच्या आतच ते ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. (Former Solapur Congress MLA Dilip Mane likely to leave Shiv Sena to join NCP)
दिलीप माने हे सोलापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार आहेत. दिलीप माने यांनी ऑगस्ट 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागता होता. त्याचवेळी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी आशा लावून बसलेल्या महेश कोठे यांचा हिरमोड झाला होता.
राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक वाढवली
आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) दिलीप माने इच्छुक आहेत. मात्र सोलापूर विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. तिन्ही पक्षांची मदत मिळेल असा अंदाज लावून मानेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जवळीक वाढवल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेवर संधी मिळवण्यासाठी दिलीप माने प्रयत्नशील असल्याचं बोललं जातं. दिलीप माने यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठीही वाढवल्या आहेत.
कोण आहेत दिलीप माने?
दिलीप माने हे काँग्रेसच्या तिकीटावर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून 2009 मध्ये आमदारपदी निवडून आले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑगस्ट 2019 मध्ये काँग्रेसची साथ सोडत माने त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागता.
महेश कोठेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मुहूर्त नाहीच
दरम्यान, शिवसेनेचे महेश कोठे यांचा अद्याप राष्ट्रवादीत प्रवेश झाला नसला, तरी राष्ट्रवादीने कोठेंवर आगामी महापालिका निवडणुकांची जबाबदारी सोपवली आहे. मात्र याबाबत शिवसेनेने कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
कोण आहेत महेश कोठे?
शिवसेनेच्या महेश कोठे यांनी सोलापूर मध्य मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली होती. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. प्रणिती शिंदे आणि महेश कोठे यांच्यात चांगलंच शत्रुत्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांना 33 हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते.
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंनी समोरासमोर बसवून आम्हा दोघांना तिकीटावर निर्णय घेण्यास सांगितलं : दिलीप माने
(Former Solapur Congress MLA Dilip Mane likely to leave Shiv Sena to join NCP)