वरळीत 4 कोटी रुपये सापडले, निवडणूक आयोगाची धडक कारवाई

| Updated on: Oct 19, 2019 | 9:48 PM

वरळी मतदारसंघात नुकतंच 4 कोटी रुपये सापडल्याची माहिती नुकतंच समोर आली आहे. वरळीत एवढी रक्कम कशासाठी आणली होती याची चौकशी (4 Crore seized in worli) सध्या सुरु आहे. 

वरळीत 4 कोटी रुपये सापडले, निवडणूक आयोगाची धडक कारवाई
Follow us on

मुंबई : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने वरळीत धडक कारवाई केली आहे. वरळी मतदारसंघात 4 कोटी रुपये सापडल्याची माहिती नुकतंच समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. वरळीत एवढी रक्कम कशासाठी आणली होती याची चौकशी (4 Crore seized in worli) सध्या सुरु आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत अनेक ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादनशुल्क विभाग यांनी एकत्रित ही सर्व कारवाई करत आहेत.

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 142 कोटी 59 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात 52 कोटी 70 लाख रुपये रोख रक्कम असून 21 कोटी 54 लाखांची दारु जप्त केली आहे. तर 47 कोटी 64 लाखांची सोने-चांदी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 20 कोटी 71 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आलं (4 Crore seized in worli) आहे.

वरळी मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याचे कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. सुरेश माने निवडणूक लढत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त पोलीस अधिकारी गौतम गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांच्या व्यतिरिक्त बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही वरळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत थेट आदित्य ठाकरेंना त्यांनी आव्हान केलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली होती. वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे तसेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले माजी मंत्री सचिन अहिर हे देखील आदित्य ठाकरेंचा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.  आदित्य ठाकरे लाखोंच्या मताधिक्याने वरळीतून निवडून येतील असा विश्वासही शिवसेना नेते व्यक्त करत आहे. त्यामुळे वरळीकर नक्की आपला कोणाला देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.