मुंबई – महाराष्ट्रातलं (Maharashtra) राजकारण तापल्यापासून रोज नव्या घडामोडी घडतं असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या (BJP) पोलखोल रथाच्या गाडीची काच फोडल्याचं प्रकरण नुकतचं उजेडात आलं आहे. हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला असण्याची शक्यता पोलिसांनी (Mumbai Police) व्यक्त केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटिव्ही तपासले. त्या प्रकरणात असणाऱ्या चौघांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रकरण चेंबूरमध्ये घडले होते. चेंबूर पोलिसांना अथक प्रयत्न करून आरोपीची ओळख पटवली आहे.
Maharashtra | Four people have been identified in connection with an attack on BJP’s ‘pol khol’ campaign bus in the Chembur area of Mumbai. Search on to find them: Mumbai Police pic.twitter.com/3rkUnGQeGe
— ANI (@ANI) April 19, 2022
गाडीची काच फोडल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काच फोडली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु हे कृत्य कोणी याला अद्याप पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. सध्या चार जणांची ओळख पटली असून लवकरचं त्यांना ताब्यात घेतले जाणार आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येणार आहे. हे प्रकरण कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलं आहे. या प्रकरणात कितीजण सहभागी आहेत याची चौकशी होणार आहे.
भाजपच्या पोलखोल रथाचे आज चेंबूर येथे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होते. काच फोडून गाडीचं नुकसान केल्याची पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. आता पोलिस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.