मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय. यामध्ये मुंबईतील सर्व सहा जागांचा समावेश आहे. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या 17 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.
तिसऱ्या टप्प्यात पुण्यात सर्वात कमी मतदान झालं होतं. चौथ्या टप्प्यातही काही मतदारसंघांमध्ये तिच परिस्थिती आहे. मुंबईत सकाळपासूनच मतदारांनी मोठी गर्दी केली होती. तर उच्चभ्रू लोकांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईत मात्र मतदानाचा टक्का पाच वाजेपर्यंत अत्यंत कमी होता.
17 जागांवरील 2014 च्या मतदानाची टक्केवारी
नंदुरबार- 66.77%
धुळे- 58.68%
दिंडोरी- 63.41%
नाशिक- 58.83%
पालघर- 62.91%
भिवंडी- 51.62%
कल्याण- 42.94%
ठाणे- 50.87%
उत्तर मुंबई- 53.07%
उ. पश्चिम मुंबई- 50.57%
ईशान्य मुंबई- 51.70%
उ. मध्य मुंबई- 48.67%
द. मध्य मुंबई- 53.09%
द. मुंबई- 52.49%
मावळ- 60.11%
शिरुर- 59.73%
शिर्डी- 63.80%
मतदारसंघ आणि विद्यमान खासदार
नंदुरबार : हिना गावित, भाजप
धुळे : डॉ. सुभाष भामरे, भाजप
नाशिक : हेमंत गोडसे, शिवसेना
पालघर : राजेंद्र गावित, भाजप (पोटनिवडणुकीत विजयी)
भिवंडी : कपिल पाटील, भाजप
कल्याण : श्रीकांत शिंदे, शिवसेना
ठाणे : राजन विचारे, शिवसेना
मावळ : श्रीरंग बारणे, शिवसेना
शिरुर : शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना
शिर्डी : सदाशिव लोखंडे, शिवसेना
मुंबई उत्तर : गोपाल शेट्टी, भाजप
मुंबई उत्तर पश्चिम : गजानन कीर्तीकर, शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व : किरीट सोमय्या, भाजप
मुंबई उत्तर मध्य : पूनम महाजन, भाजप
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे, शिवसेना
मुंबई दक्षिण : अरविंद सावंत, शिवसेना