मुंबई : शिंदे, फडणवीस सरकार (Shinde, Fadnavis governments) सत्तेत आल्यापासून मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरू आहे. यावरून अनेकदा विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे. आता पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला 850 कोटी रुपयांचा निधी रोखण्यात आला आहे. त्यामुळे 850 कोटी रुपयांची कामं स्थगित झाली आहेत. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माहिती दिली. 850 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील शिंदे, फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याचं पहायला मिळालं.
शिंदे, फडणवीस सरकारने विविध विकास कामांसाठी असलेला 850 कोटी रुपयांचा निधी रोखला आहे. यामुळे अनेक कामांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. कारण विरोधी पक्षनेते अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना वाटलेला निधी रोखण्यात आला आहे.
सत्तेत आल्यापासून फडणवीस, शिंदे सरकारकडून महाविकास आघाडीच्या काळातील योजनांना स्थगिती देणे सुरूच आहे. विरोधकांनी यावरून अनेकदा सरकारवर जोरदार टीका केली. मात्र आता पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारने 850 कोटी रुपयांचा निधी रोखला आहे. अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी या निधीचं वाटप केलं होतं. यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.