मोहंमद इरफानः विदर्भात भाजपचं संघटन अधिक मजबूत करण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना यश येताना दिसंतय. गडचिरोलीच्या (Gadchiroli) ग्रामीण भागावर वर्चस्व असलेलं एक बडं प्रस्थ भाजपच्या वाटेवर आहे. गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते दीपक आत्राम (Deepak Atram) यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यानंतर दीपक आत्राम लवकरच भाजपात प्रवेश करतील, या चर्चांना उधाण आलं आहे.
आदिवासी विद्यार्थी संघटना हा गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिक पक्ष मोठा असून जिल्हा परिषदेमध्ये दोन टर्म व अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे आमदार देवराव होळी यांच्यासोबत माजी आमदार दीपक आत्राम यांनी भाजप पक्षाचे जेष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट निश्चितच भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
आदिवासी विद्यार्थी संघटना हा गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात एक चांगली ओळख निर्माण करणारा पक्ष आहे.
आदिवासी विद्यार्थी संघटना ही संघटना मागील २० वर्षांपासून विदर्भात कार्यरत आहे. दीपक आत्राम यांनी ही संघटना सुरु केली. त्यानंतर या पक्षावर निवडणूक लढवून दीपक अत्राम हे आमदारही झाले.
आदिवासी संघटना या पक्षाचे एक वरिष्ठ नेते म्हणून अजय कंकडालवार यांची ओळख आहे. अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत असताना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला.
जिल्ह्यातील अहेरी भामरागड एटापल्ली मुलचेरा सिरोंचा या पाच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये व पंचायत समितीमध्ये यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी निवड निवडणूक लढवली होती व अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्ता सध्या आहे.
सिरोंचा तालुक्यात नगरपंचायत निवडणूकीच्या वेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते बबलू पाशा यांनी एकतर्फी विजय मिळवत 10 नगरसेवकांना विजयी केले होते.
सध्या जिल्ह्यातील सर्वात मोठा स्थानिक पक्ष असलेला आदिवासी विद्यार्थी संघटना भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.